गोमंतकीय सिने निर्मात्यांवरील अन्याय दूर न झाल्यास आंदोलन:कामत

0
734

 

गोवा खबर:यंदा होणाऱ्या ५०व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘इंडियन पनोरमा’ विभागात एकाही गोमंतकीय चित्रपटाचा समावेश न केल्या बद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी  तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यानी ताबडतोब यात लक्ष घालुन गोमंतकीय चित्रपटांचा समावेश इफ्फिच्या अधिकृत विभागात करावा अशी मागणी कामत यांनी केली आहे.

 ट्वीट करून दिगंबर कामत यानी आपला असंतोष व्यक्त करताना इफ्फिच्या आयोजनात 2012 नंतर गोवा सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
आपण  मुख्यमंत्री  तसेच गोवा मनोरंजन संस्थेचा अध्यक्ष  असताना आमच्याकडे पाच अधिकृत विभागांची जबाबदारी व अधिकार होते. गोमंतकीय सिने निर्मात्यांचे अधिकाधीक चित्रपट इफ्फित प्रदर्शीत करण्यावर आम्ही भर दिला होता,याची आठवण कामत यांनी करून दिली आहे.
तत्कालीन काॅंग्रेस सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यानी गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ‘गोवा आॅन सेल्युलॉयड”हा खास अधिकृत विभाग तयार करुन त्याची जबाबदारी मनोरंजन संस्थेकडे दिली होती,याचीही आठवण कामत यांनी करून दिली आहे.
यंदा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त दिनेश भोसले यांच्या ‘आमोरी’ या चित्रपटाला इंडियन पॅनोरमा विभागात स्थान देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यापुर्वी राष्ट्रिय पुरस्कार मिळालेले सर्व गोमंतकीय चित्रपट इफ्फित प्रदर्शित करण्यात आले आहेत याची सरकारने नोंद घेणे गरजेचे आहे,अशी मागणी कामत यांनी केली आहे.
गोमंतकीय सिने निर्माता राजेश पेडणेकर यांचा ‘ काजरो’ हा चित्रपट ‘मामी’ चित्रपट महोत्सवात निवडण्यात आला होता. दिलीप बोरकर व शामराव यादव यांचा ‘बडे अब्बू’ हा चित्रपट झारखंड राष्ट्रिय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. या सर्व चित्रपटांना इफ्फिच्या अधिकृत विभागांत स्थान देणे गोवा सरकारची जबाबदारी आहे,असे सांगून कामत म्हणतात,गोवा सरकार व मनोरंजन संस्थेने ताबडतोब गोमंतकीय सिने निर्मात्यांवर झालेला अन्याय दूर करावा. सरकारने योग्य पाऊले न उचलल्यास आगामी इफ्फि वेळी गोमंतकीय सिने निर्मात्यांसोबत  निदर्शने करण्यास मागे पुढे पाहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावे,असा इशारा कामत यांनी दिला आहे.
List of 26 Feature Films selected in the Indian Panorama 2019 is as follows:
S. No. Name of the film Language Director
1. Kenjira Paniya Manoj Kana
2. TujhyaAaila Marathi Sujay Sunil Dahake
3. Anandi Gopal Marathi Sameer Sanjay Vidwans
4. Bhonga Marathi ShivajiLotanPatil
5. Mai Ghat:Crime No 103/2005 Marathi Ananth Narayan
Mahadevan
6. Pareeksha Hindi Prakash Jha
7. OththaSeruppu Size 7 Tamil RadhakrishnanParthiban
8. Nirban Bengali GautamHalder
9. Kolaambi Malayalam T K Rajeev Kumar
10. Jyeshthoputro Bengali Kaushik Ganguly
11. Ek Je Chhilo Raja Bengali SrijitMukherji
12. Ranganayaki Kannada DayalPadmanabhan
13. Netaji Irula Vijeesh Mani
14. Uyare Malayalam Manu Ashokan
15. Jallikettu Malayalam Lijo Jose Pellissery
16. Iewduh Khasi/Garo PradipKurbah
17. Photo-Prem Marathi Aditya
Rathi&GayatriPatil
18. House Owner Tamil Lakshmy Ramakrishnan
19. BahattarHoorain Hindi Sanjay Puran Singh
Chauhan
20. In The Land Of Poison Women Pangchenpa Manju Borah
21. Hellaro Gujarati Abhishek Shah
Mainstream Cinema
22. Uri : The Surgical Strike Hindi Aditya Dhar
23. F2 Telugu Anil Ravipudi
24. Gully Boy Hindi Zoya Akhtar
25. Super 30 Hindi VikashBahl
26. Badhaai Ho Hindi Amit Ravindernath Sharma
The Jury has chosen the film HELLARO (Gujarati) directed by Abhishek Shahas the Opening
Feature Film of Indian Panorama 2019
List of Non – Feature Films
.No Title of the Film Language Director
1. Bohubritta Assamese Utpal Dutta
2. Bouma Bengali Debatma Mandal
3. Mamatva Brij Kirti
4. Letters English Nitin Shingal
5. A Thankless Job English Vicky Barmecha
6. Elephants Do Remember English Swati Pandey, Manohar Singh
Bisht&Viplove Rai Bhatia
7. Bridge Hindi Bikramjit Gupta
8. Maya Hindi Vikas Chandra
9. Sathyarthi Hindi Pankaj Johar
10. Nooreh Kashmiri Ashish Pandey
11. ShabdhikunnaKalpa Malayalam Jayaraj
12. IravilumPakalilumOdiyan Malayalam NovinVasudev
13. Gadhul Marathi GanesgShivajiShelar
14. Son Rise Hindi VibhaBakshi
15. The Secret Life of Frogs English Ajay Bedi& Vijay Bedi
The Non-Feature film Jury selected the film “Nooreh” directed by Ashish Pandey as the
Opening non-feature film of Indian Panorama 2019.