गोमंतकीय जीवरक्षकाना धमकावणारे बाबू आजगावकर दृष्टीचे एजंट:स्वाती केरकर

0
630

 

 

गोवा खबर: गोव्यातील भाजप सरकारच्या पर्यटन खात्यातील “मिशन ३० टक्के कमिशन” चे प्रणेते पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकरानी  गोमंतकीय जीवरक्षकाना पुढील सात दिवसात  मेसर्स दृष्टी कंपनीकडे कामावर रुजू होण्याची दिलेली धमकी म्हणजे ते सदर कंपनीचे एजंट असल्याचा पुरावा आहे. आपले ‘मिशन ३० टक्के कमिशन’ धोरण पुढे चालु राहावे म्हणुनच गोमंतकीय जीवरक्षकाना धमकी देऊन बेकायदेशीर कृत्यांत गुतलेलल्या दृष्टी कंपनीवर कृपादृष्टी  दाखवण्याची केवीलवाणी धडपड बाबू आजगावकर करीत आहेत.

 

पर्यटनमंत्री म्हणुन जास्त काळ पदावर राहिल्यास गोमंतकीय पर्यटन क्षेत्रातील व्यावसायीकांवर भिक मागण्याची पाळी ते आणतील. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी त्वरीत त्याना बडतर्फ करावे व पर्यटन खात्यातील भ्रष्ट कारभाराला आळा घालावा.

 

पर्यटन खात्याच्या  इव्हेंट मॅनेजमेंट एजंसीकडुन आपले व आपल्या कुटूंबियांचे विदेश दौरे पुरस्कृत करुन घेणारे आजगावकर हे स्वताच एक पर्यटक बनले असुन, त्यामुळे त्याना गोव्यातील पर्यटन उद्योगाचे भानच राहिलेले नाही. जीवरक्षकाना धमकी देणाऱ्या पर्यटन मंत्र्याना दृष्टी कंपनीच्या भ्रष्ट कारभारामुळेच मागील एका महिन्यात चार पर्यटकांचा जीव गेला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. सदर दुर्देवी घटनांबद्दल त्यानी एक शब्द काढलेला नाही यावरुन त्यांची असंवेदनशीलता दिसुन येते.

 

जीवरक्षकाना कामावर रुजू व्हा असे सांगणाऱ्या पर्यटन मंत्र्यानी दृष्टी कंपनीचे कंत्राट किती काळासाठी आहे हे स्पष्ट करावे, कारण मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी सदर कंत्राट केवळ तिन महिन्यांसाठी वाढवुन देण्यात आले होते असे स्पष्ट केले होते.

 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यानी किनारे स्वच्छता व किनारे सुरक्षा कंत्राट मेसर्स दृष्टी कंपनीला पुढील पाच वर्षे देण्यासाठी रचलेले कारस्थान पुढील काही दिवसांत पुराव्यानीशी आम्ही उघड करू.

 

गोमंतकीय जीवरक्षकाना सात दिवसात कामावर रुजू होण्याची धमकी देण्याची तत्परता दाखवणाऱ्या  बाबू आजगावकरानी सरकारी नोकर असलेले आपले बंधू डाॅ. श्रीकांत आजगावकर व भावजय रश्मी आजगावकर यांचा लंडन-अमेरीका दौऱ्याचा खर्च कुणी, कसा व का केला हे अजुनही स्पष्ट करण्याचे धाडस दाखवलेले नाही. पर्यटन मंत्र्याचे नातेवाईक पर्यटन मंत्र्याच्या लंडन-अमेरीका दौऱ्यांच्या दरम्यान त्यांच्या सोबत होते हे सरकारी कागदपत्रांच्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे.

 

गोमंतकीय जीवरक्षकाना धमकावण्याचे बाबू आजगावकरानी बंद करावे. गोमंतकीय जीवरक्षक म्हणजे गांधी मार्केट नव्हे हे त्यानी ध्यानात ठेवावे.

 

जीवरक्षकाना सरकारी सेवेत सामावुन घ्या व दृष्टी कंपनीचे कंत्राट रद्द करा ह्या मागण्या मान्य केल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.