गोदरेज अप्लायन्सेसने सादर केले नावीन्यपूर्ण, भविष्यात्मक कूलिंग तंत्रज्ञान

0
591

 

नवे क्युब दाखल – विशेष, प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग पर्यावरणपूरक तंत्रज्ञान असणारा, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी अन्नपदार्थ व पेये यासाठी आकर्षक व आटोपशीर कूलर

 

गोवा खबर: गोदरेज अप्लायन्सेस या भारतातील होम अप्लायन्सेस श्रेणीतील आघाडीच्या कंपनीने आणि रेफ्रिजरेशनमधील कौशल्यासाठी नावाजलेल्या ब्रँडने गोदरेज क्युब हे विशेष लाइफस्टाइल उत्पादन दाखल केले असून त्यास प्रगत सॉलिड टेस्ट इलेक्ट्रॉनिक कूलिंग हरित तंत्रज्ञाने पाठबळ आहे. हे तंत्रज्ञान थंड करते, पण फ्रीझ करत नाही.

 

वैशिष्ट्यपूर्ण कूलिंग उपकरण असणारे गोदरेज क्युब हे प्रामुख्याने लोकांच्या लहान प्रमाणातील कूलिंग गरजांसाठी तयार केले आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या अन्य कूलिंग उत्पादनांमध्ये न आढळणारे असे उत्तम दिसणाऱ्या या उत्पादनाचे फायदे म्हणजे, तुलनेने अधिक साठवणूक क्षमता असणारा आटोपशीर आकार आहे; आवाज न करता काम करते; यामध्ये कॉम्प्रेसरचा समावेश नाही; हे झीरो फ्रॉस्ट उत्पादन आहे, म्हणजे यासाठी डिफ्रॉस्टिंग करावे लागत नाही; आणि हे उत्पादन घरातील इन्व्हर्टरवरही चालते. हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी हे उपयुक्त तंत्रज्ञान दाखल करणारा गोदरेज हा पहिला ब्रँड आहे.

 

सर्व पारंपरिक कूलिंग उपकरणे रेफ्रिजरंटवर आधारित कूलिंगवर अवलंबून राहत असताना, गोदरेज क्युब हे रेफ्रिजरंट-मुक्त आहे आणि प्रगत थर्मो-इलेक्ट्रिक चिपच्या मदतीने काम करते. बहुतेकशा रेफ्रिजरंटमुळे निरनिराळ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर घातली जाते. म्हणूनच, नॉन-रेफ्रिजरंट प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान हे सर्वात पर्यावरणपूरक कूलिंग उत्पादन आहे.

 

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये वापर करण्याबाबत प्रयोग करण्यासाठी क्युबचा वापर देशातील निरनिराळ्या भागांमध्ये करण्यात आला आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. गोदरेज क्युब हे आदर्श वैयक्तिक फूड व बेव्हरेज कूलिंग उपकरण असून ते लिव्हिंग व वर्क स्पेस येथे वापरण्यासाठी साजेसे आहे, तसेच आटोपशीर आकार, विनाआवाज कार्य व देखणे रूप यामुळे हे उत्पादन हॉटेलांसाठी योग्य ठरेल. यामध्ये इतरही काही वैशिष्ट्ये आहेत, जशी एलईडी असलेला अंतर्भाग, स्टॅबिलायजर-मुक्त काम, मॅग्नेटिक ऑटो डोअर क्लोजर सिस्टीम, सुलभ देखभाल व सर्व्हिस आणि या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी, तसेच 100% हरित व पर्यावरणपूरक.

विक्रम सिंग, एव्हीपी व नॅशनल हेड, सर्व्हिस रेव्हेन्यू व डायरेक्ट सेल्स, गोदरेज अप्लायन्सेस, यांनी सांगितले, “आम्ही 61 वर्षांपूर्वी उत्पादित केलेला पहिला भारतीय रेफ्रिजरेटर दाखल केल्यापासून, आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने त्यामध्ये बदल करत आहोत. भारतातील घराघरात रेफ्रिजरेटरसाठी लोकप्रिय पर्याय ठरत आहोत. गेल्या काही वर्षांत आम्ही रेफ्रिजरेशन / कूलिंग व संबंधित विषयांत मोठे कौशल्य विकसित केले आहे. गोदरेजमध्ये आम्ही ग्राहकांना आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे, तसेच त्याच वेळी पृथ्वीबद्दलची व भावी पिढ्यांसाठीची जबाबदारीही जपली आहे. क्युबच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांसाठी आणखी एक विशेष लाइफस्टाइल उत्पादन सादर केले आहे. हे उत्पादन ग्राहकांच्या छोट्या कूलिंग गरजा पूर्ण करेल, तसेच त्यास प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग हरित तंत्रज्ञानाचे पाठबळ देण्यात आले आहे व त्यामुळे हे उत्पादन शाश्वततेचे प्रतिक ठरले आहे. शाश्वतता, पोर्टेबिलिटी, विनाआवाज काम, लहान आकार अशा विविध पैलूंच्या बाबतीत या उत्पादनाची सरसता विचारात घेता, क्युब हे हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी आदर्श उत्पादन आहे. पेये, गोड पदार्थ, फळे, चॉकलेट, डेअरी अशा विविध प्रकारची साठवणूक करण्यासाठी साजेसे असणारे क्युब विविध प्रकारे उपयुक्त आहे. ‘सोच के बनाया है’ या आमच्या ब्रँडच्या ब्रिदनुसार ग्राहकांसाठी नावीन्य, महत्त्वाचे व हरित तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे क्युब हे प्रतिक आहे.”

 

नवा आकर्षक क्युब दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – मेटॅलिक ग्रे व ब्लॅक आणि किंमत 6990 रुपयांपासून आहे आणि भारतभर उपलब्ध होणार आहे.