गेल्या तीन वर्षात देशभरातील 170426 शाळांमधील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याला मंजुरी 

0
1013

गोवा खबर:राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकार विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत आहे. शाळेत आणि शाळेबाहेर विद्यार्थीनी सुरक्षित राहाव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यातील आत्मविश्वास टिकून राहावा, या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जात आहे.

गेल्या तीन वर्षात देशभरातील 170426 शाळांमधील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.2015-16 साली 49,517 शाळांमध्ये प्रशिक्षणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी 4062.02 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. 2016-17 साली 57,500 शाळांमध्ये प्रशिक्षणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी 4880.75 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली तर 2017-18 या वर्षात 63,409 शाळांमध्ये प्रशिक्षणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी5580.81 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली.

मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.