गेरा डेवलपमेंट्सद्वारे गेराज रिव्हर ऑफ जॉय प्रकल्प सादर

0
952

गोव्यातील पहिला चाइल्डसेंट्रिक होम्स उपक्रम कदंब-पणजीत साकारतोय
क्रीडा, कला व व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मनोरंजनातून शिक्षण देण्यासाठी बायचंग भुतिया, महेश भूपती आणि शामक दावर अशा जगप्रसिद्ध सेलिब्रिटींसमवेत सहकार्य करार

• आजच्या जमान्यातील युवा गोमंतकीय घर खरेदीदारांना सक्षम करणारे व मुलांच्या सर्वांगीण विकासाला साधनसुविधा उपलब्ध करणारी पहिलीवहिली संकल्पना
• पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या गरजा ध्यानात घेऊन परिपूर्ण घर विकसित करण्याची चाइल्डसेंट्रिक होम्स ही संकल्पना
• क्रीडा, मानसिक विकास, कला, संगीत, अभिनय, पुनर्निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये भारतातील प्रतिथयश व्यक्तींच्या सहकार्यातून मुंलांना बौद्धिक, शारिरीक व व्यावसायिक प्रशिक्षण देणारी व त्या माध्यमातून सर्वोत्तम व दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे पालकांना शक्य होणारी संकल्पना
• क्रांतिकारी संकल्पना व नावीन्यपूर्ण उपाय ज्यामुळे निवासी गृहबांधकाम क्षेत्रात नवी श्रेणी विकसित करत उत्पादन आणि सेवा देणारी प्रणाली स्थापित करण्याचा मापदंड स्थापित
• चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पना सादर करण्यात आलेल्या पुणे व बेंगळुरूनंतर गोव्याचा तिसरगोवा, १५ जानेवारी २०१८ 
४७ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या गेरा डेवलपमेंट्सने  पुणे, गोवा शहरांत प्रिमिअम निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारले आहेत. गेरा डेवलपमेंट्सने आज कदंब-पणजी परिसरात गेराज रिव्हर ऑफ जॉय या गोव्यातील पहिल्या चाइल्डसेंट्रिक होम्स प्रकल्पाची उभारणी करण्याची घोषणा करत कार्निवलचा आनंद द्विगुणित केला. भारतीय फुटबॉलमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व श्री. बायचंग भूतिया, टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू श्री. महेश भूपती आणि भारतातील कंटेम्पररी डान्स गुरू श्री. शामक दावर हे चाइल्डसेंट्रिक होम प्रकल्पाचे दूत असून गोव्यातील या प्रकल्पाच्या घोषणेसाठी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. चाइल्डसेंट्रिक होम्स प्रकल्पातील विविध वैशिष्ट्यांसह क्रीडा, मानसिक विकास, कला, संगीत, अभिनय, पुनर्निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये भारतातील प्रतिथयश व्यक्तींच्या सहकार्यातून मुंलांना बौद्धिक, शारिरीक व व्यावसायिक प्रशिक्षण देणारी व त्या माध्यमातून सर्वोत्तम व दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे पालकांना शक्य होणार आहे.
चाइल्डसेंट्रिक होम्स ही संकल्पना सादर करताना गेरा डेवलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रोहित गेरा म्हणाले, “आमच्या या पुरस्कारप्राप्त चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पनेला गोव्यातून भरघोस प्रतिसाद लाभला आहे. गेराज रिव्हर ऑफ जॉयमधील ३६४पैकी १९० घरांची विक्री यापूर्वीच झाल्याचे सांगताना मला अभिमान वाटत आहे. प्रिलॉंच फेजमध्येच ५०% हून अधिक घरांची विक्री होणे ही बाब आजच्या ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत असल्याचे दर्शविते. गेराज रिव्हर ऑफ जॉयमधून महेश भूपती, बायचंग भूतिया, शामक दाव यांच्यासह अनिल कुंबळे, शंकर महादेवन आणि मायकेल फेल्प्स स्वीमिंग अकादमी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या तज्ञांचे सहकार्य घेऊन अगदी घराशेजारीच नृत्य, गायन, जलतरण, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट आदी क्षेत्रामध्ये मुलांचा कौशल्यविकास करण्यासाठी साधनसुविधा गेरा डेवलपमेंट्स उभारणार आहे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न केले आहेत. मुलांच्या आवडीला एक व्यासपीठ मिळेल आणि त्या क्षेत्रातील कौशल्य विकसित होऊन ते सर्वोत्तम बनवण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्याची संधी गेराच्या रिव्हर ऑफ जॉय प्रकल्पामुळे मिळणार आहे. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पामध्येच या सुविधा उपलब्ध होणार आहेत.”
नोकरी-व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या तरुण मुलांसाठी तसेच नव्यानेच संसार सुरू केलेल्या कुटुंबासाठी, न्युक्लिअर फॅमिलीतील मुलांना सर्वोत्तम व दर्जेदार संधी सादर देऊ पाहणाऱ्या पालकांच्या गरजा समोर ठेवून ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. आजवर अशा प्रकारचा सादर न झालेली गृहसुविधा प्रवास व विविध कटकटीतून मुक्त करत अनेक संधी सादर करणार आहे.
गेरावर्ल्ड अॅप (सध्या ग्राहकांसाठी केवळ घरखरेदीच्या व्यवहारांपुरतेच मर्यादितपणे उपलब्ध करण्यात आले आहे) चाइल्डसेंट्रिक संकल्पनेतील विविध सुविधा व सेवा यांच्यासाठी नोंदणी करण्यासाठीही अद्ययावत केले जात आहे.
चाइल्डसेंट्रिक होम्स या नावीन्यपूर्ण संकल्पनेबाबत बायचंग भूतिया, महेश भूपती, शामक दावर या मान्यवरांनी या प्रकल्पाशी जोडले गेल्याचा आनंद व्यक्त करतानाच या संकल्पनेच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचा विश्र्वास व्यक्त केला. या प्रकल्पाचा एक भाग होण्याच्या इच्छेतून गेराज रिव्हर ऑफ जॉय प्रकल्पात त्यांची प्रशिक्षण केंद्रे उभी राहत आहेत.
बायचंग भूतिया म्हणाले, “देशातील युवकांमध्ये फुटबॉल खेळाबाबत जागृती करणे आणि प्राथमिक पातळीवर प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी मी सतत देशभर फिरत असतो. बीबीएफएसच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्यासाठी एक चांगले व्यासपीठ तसेच उत्तम साधनसुविधांसह प्रशिक्षित व्यावसायिकांकडून अनेक गोष्टी शकण्याची संधी मला मिळाली, जी मला शालेय जीवनात मिळाली नाही. तसेच देशात व्यावसायिक फुटबॉलचा विकास करण्यासाठी पालक आणि प्रशिक्षकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे आवश्यक ठरते.”
महेश भूपती म्हणाले, “आपल्या देशातील बाल व तरुण पिढीतील कौशल्य  हेरणे व त्यांच्या विकासाला चालना देऊन खरेखुरे स्टार घडवण्यासाठी गेराची चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पना एक चांगला पर्याय ठरू शकते. या सहकार्यातून या प्रकल्पात राहणाऱ्यांसाठी महेश भूपती टेनिस अकादमीच्या सुविधा उपलब्ध करून टेनिसमध्ये करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम संधी उपलब्ध करणे आम्हाला शक्य होणार आहे. गेराचे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आमचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मुळे येथील मुलांना त्याच्या सुरक्षा-सवडीने आपले कौशल्य विकसित करणे शक्य होणार आहे. या दोन्ही संस्था पाल्यांना सर्वोत्तम संधी देण्याच्या तळमळीसाठी आपली व्यावसायिक मूल्ये जपत असून या व्यासपीठाच्या माध्यमातून काहीतरी विशेष करता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो.”
शामक दावर म्हणाले, “गेराच्या चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पनेच्या माध्यमातून या प्रकल्पात राहणाऱ्यांसाठी मी माझा ३० वर्षांचा नृत्यक्षेत्रातील अनुभव उपलब्ध करणार आहे. मुलांमध्ये नवा विश्र्वास निर्माण करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल आणि यासाठी त्यांना प्रवास व इतर कटकटींचा त्रास होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. जगभर लोकांना नृत्य शिकवण्याचा माझा अनुभव असून गेराच्या चाइल्डसेंट्रिक होम्समधील ग्राहकांना त्यांच्या घराजवळच नृत्य प्रशिक्षण सुविधेतून माझा अनुभव वृद्धिंगत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनातून तसेच गेराच्या सुविधांमुळे काहीतरी अशक्यप्राय असे शक्य करून दाखवता येईल असे मला वाटते.”
चाइल्डसेंट्रिक होम्स संकल्पनेमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात एक नवी श्रेणी विकसित होणार असून आणि याद्वारे ग्राहकांना प्रिमिअम घर व सुविधांबरोबरच आपल्या पाल्यांना सुरक्षा, सुविधा, आनंद व व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध संधी उपलब्ध करणार आहे. ही संकल्पना नावीन्यपूर्ण असून बदलत्या काळानुसार युवावर्गाच्या घराबाबतच्या गरजांची पूर्तता करणार आहे. या बहुमुखी गृह प्रकल्पामुळे मुलांना कला, क्रीडा, नृत्य, संगीत आदी क्षेत्रांतील आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये सर्वोत्तम बनवण्यासाठी उत्तम व्यासपीठ, सुविधा प्रशिक्षण व मार्गदर्शक उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर डेल कार्नेजी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वैदिक गणित, वयोगणानुसार संगणक लॅब व गेमिंग रूम, योग, बीएमएक्स, स्केटबोर्डिंग, निवडक गुरुकुल विभाग, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम यांचाही लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
गेराज रिव्हर ऑफ जॉय विषयी:
• अपार्टमेंट, रो हाऊस, क्लस्टर विला प्रकारांतील एकूण ३६४ घरे
सुविधा
 
क्लबहाऊस
क्रीडांगण
संगीत कक्ष
आर्ट स्टुडिओ
नृत्य स्टुडिओ/ योगकक्ष
गेमिंग रूम
टेनिस कोर्ट
लँडस्केप गार्डन
हाफ-ऑलिम्पिक स्विमिंग पूल
बास्केटबॉल कोर्ट
क्रिकेट प्रशिक्षण पिच / नेट्स
जिम्नॅशियम
 
• घरांच्या माध्यमातून जीडीपीएल खालील सेवा सादर करत आहे:
• सर्वोत्तम प्रशिक्षण अकादमींसमवेत ३ वर्षांचा करार
• ३ वर्षांसाठी हमी व व्यवस्थापन टीम
• प्रशिक्षण वर्ग
• सर्व कुटुंबाला, समाजाला सामावून घेण्यासाठी वयोगटानुसार विविध प्रकल्प व सुविधा
 
• नृत्य, संगीत, कला, अभिनय, टेनिस, पोहणे, क्रिकेट, बुद्धीबळ, व्यक्तिमत्त्व विकास, गेमिंग रूम, निवासी व अनिवासी शिबिरे
गेराच्या चाइल्डसेंट्रिक होम्स व इतर प्रकल्पांबाबत माहितीसाठी भेट द्या www.gera.in