गृह आधार लाभधारकानी हयात आणि उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक

0
603

गोवा खबर: महिला आणि बाल विकास संचालनालयाने गृह आधार योजनेच्या लाभधारकाना प्रत्येकवर्षी हयात असलेला दाखला आणि संबंधित मामलेदारांकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला देणे सक्तीचे केले आहे. हे दाखले दरवर्षी ज्या महिन्यामध्ये लाभधारकाना गृह आधार योजनेचा लाभ मंजूर झाला आहे त्याच महिन्यामध्ये संबंधित तालुका महिला आणि बाल विकास संचालनालयाच्या कचेरीत सादर करावा. तसेच बँक खात्यात आधार कार्ड जोडले पाहिजे.

त्याचप्रमाणे लाभधारकानी आपल्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम सतत सहा महिने काडली नाही तर ही रक्कम संबंधित बँक डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून महिला आणि बाल विकास संचालनालयाकडे जाईल. गृह आधार योजनेची अर्जदार गोव्याबाहेरील असल्यास व तीने गोव्यातील व्यक्तीबरोबर लग्न केले असल्यास त्यानी आपल्या जन्म दाखल्याची प्रमाणित प्रत आणि गोव्यातील एका वर्षाचा रहिवासी दाखला आणि आपल्या नवऱ्याच्या १५ वर्षाचा रहिवासी दाखला सोबत जोडावा.