‘गूज’च्या पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा ; २०१२ ते २०१८ सालांसाठी दिले जाणार पुरस्कार

0
749

गोवा खबर:गोवा श्रमिक पत्रकार संघटने (गूज) च्या प्रतिष्ठेच्या पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध विभागांसाठीच्या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. तज्ज्ञ परीक्षकांकडून या अर्जांची छाननी करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. 

२०१२ ते २०१८ अशा सहा वर्षांच्या पुरस्कारांसाठी हे अर्ज मागविण्यात आले होते. यापूर्वी पुरस्कारांसाठी आवश्यक अर्जच दाखल न झाल्यामुळे हे पुरस्कार घोषित करण्यात आले नव्हते. यावेळी मात्र सर्व वर्षांसाठीच्या पुरस्कारांसाठी अर्ज मागवून हे पुरस्कार घोषित केले आहेत. लवकरच पुरस्कार प्रदान सोहळ्याची घोषणा केली जाणार असून, त्यात या पुरस्कारांचे वितरण केले जाईल. पुरस्कार विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र बहाल केले जाईल.

पुरस्कारप्राप्त पत्रकारांची नावे पुढीलप्रमाणे : 

सिरील डिकुन्हा पर्यावरणीय छायाचित्र पुरस्कार : 
२०१२-१३- राजतिलक नाईक (द टाईम्स ऑफ डिया), २०१३-१४- राजतिलक नाईक (द टाईम्स ऑफ इंडिया), २०१४-१५- राजतिलक नाईक (द टाईम्स ऑफ इंडिया), २०१५-१६- सगुण गावडे (द गोवन एव्हरी डे), २०१६-१७- राजतिलक नाईक (द टाईम्स ऑफ इंडिया), २०१७-१८- राजतिलक नाईक (द टाईम्स ऑफ इंडिया).

फेलिसिओ कार्दोजो पर्यावरणीय पत्रकारिता पुरस्कार : 
२०१२-१३- भिवा परब (द नवहिंद टाईम्स- इंग्रजी), २०१३-१४ आणि २०१४-१५- कुणी नाही, २०१५-१६- तेजश्री कुंभार (दै. गोमंतक- मराठी), २०१६-१७- तेजश्री कुंभार (दै. गोमंतक- मराठी) आणि भिवा परब (द नवहिंद टाईम्स- इंग्रजी), २०१७-१८- संजय घुग्रेटकर (दै.गोमंतक-मराठी) आणि आरती दास (इंग्रजी पोर्टल).

लॅम्बर्ट मास्कारेन्हास शोध पत्रकारिता पुरस्कार : 
२०१२-१३- अवित बगळे (दै. गोमंतक- मराठी), २०१३-१४- कुणी नाही, २०१४-१५- तुकाराम गोवेकर (दै. लोकमत), २०१५-१६- वसंत कातकर (दै. पुढारी), २०१६-१७- प्रसाद म्हांबरे (दै. लोकमत), २०१७-१८- स्मिता नायर (द इंडियन एक्स्प्रेस).

‘गूज’ उत्कृष्ट वृत्त छायाचित्र पुरस्कार : 
२०१६-१७- राकेश मुंडये (द नवहिंद टाईम्स), २०१७-१८- गणेश शेटकर (दै. लोकमत).

सुरेश वाळवे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार : 
२०१६-१७- विशांत वझे (डिचोली), २०१७-१८- निवृत्ती शिरोडकर (पेडणे).

सुरेश वाळवे उत्कृष्ट ग्रामीण वृत्त पुरस्कार : 
२०१६-१७- निर्घोष गावडे (द नवहिंद टाईम्स), २०१७-१८- देवेंद्र गावकर (ओ- हेराल्डो).