गुरुदत्त यांच्या जीवनावर 5 मे रोजी ग्रे डस्क ऑफ गुरुदत्त कार्यक्रम

0
932
गोवाखबर:गोवा मनोरंजन संस्था, सिनेफाईल क्लब आणि अनिल काणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रे डस्क ऑफ गुरुदत्त’ या संकल्पनेवर 5 मे रोजी सायं. 4.30 वा. मॅकॅनिज पॅलेस येथे दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 प्रख्यात चित्रपट निर्माते गुरु दत्त यांच्या बाजी , साहेब, बिवी और गुलाम  पर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांवर स्लाईड्स, दृष्ये आणि गीते दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहेत. मनोहर अय्यर हे गुरु दत
यांच्या चित्रपट कारकिर्दीवर भाषण करतील.  त्यांनी बाजी, आरपार, मिस्टर अँण्ड मिसेस 55, सीआयडी, प्यासा, कागज, के फुल अशा गाजलेल्या व्यावसायिक चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. चित्रपट निर्मिती क्षेत्रात त्यांनी नुकसानही सोसावे लागले.
 हा कार्यक्रम विद्यार्थी तज्ञ, लेखक, संशोधक तसेच चित्रपटप्रेमीसाठी उपयोगी ठरेल. हिंदी भाषेतून हा कार्यक्रम सादर होणार असून त्यासाठी सुमारे 4.30 तास लागतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे असे यावेळी तालक यांनी सांगितले. यावेळी  त्यांच्या सोबत अनिल काणे उपस्थित होते.