गुदिन्होंकडून ‘गोवा ट्रान्सपोर्ट’ अॅपचा शुभारंभ आणि मोटार वाहन नियमावरील पुस्तकाचे अनावरण

0
734

गोवा खबर:नॅशनल इन्फोर्मेटीक्स सेंटर(एनएईसी) ने विकसित केलेल्या गोवा ट्रान्सपोर्ट या अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅपचा शुभारंभ वाहतूक मंत्री  मावीन गुदिन्हो यांनी पर्वरी येथील सचिवालयात केला.  एन.डी. अग्रवाल यांनी संकलित केलेल्या गोवा मोटार वाहन नियम १९९१ वर आधारित पुस्तकाचे अनावरणही यावेळी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. वाहतूक संचालक  राजन सातर्डेकर, लेखक एन. डी. अग्रवाल आणि एनएईसी चे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

“सध्याच्या या कठीण परिस्थितीमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे आणि जग डीजीटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात असताना वाहतूक खातेही मागे राहू पाहत नाही. म्हणून, सर्वसामान्य लोकांनी आपल्या स्मार्ट फोनवर हे अॅप डाऊनलोड करावे आणि त्याचा योग्य उपयोग करावा” असे आवाहन माननीय मंत्र्यांनी उपस्थितांना संबोधताना केले.

वाहतूक खात्याच्या https://www.goatransport.gov.in या संकेतस्थळावर हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि पुढील आठवड्यापासून ते गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध होईल. रोडटॅक्स चे वार्षिक देय, पॅसेंजर टॅक्सचे मासिक देय, काऊंटर सिग्नेचर टॅक्सचे देय, सॅस  आणि चेक पोस्ट शुल्क इत्यादी विविध वैशिष्ट्ये या अॅपमध्ये आहेत.