गुगल करणार जिओ प्लँटफॉर्ममध्ये 33,337 कोटींची गुंतवणूक

0
616

भारताच्या डिजिटल प्रगतीसाठी जिओ आणि गुगल संयुक्त विद्यमाने किफायतशीर स्मार्टफोनची निर्मिती करणार

तीन महिन्यात जिओ प्लँटफॉर्ममध्ये होणार 1.5 लाख कोटींची गुंतवणूक

गोवा खबर: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (रिलायन्स इंडस्ट्रीज), जिओ प्लँटफॉर्म लिमिटेड (जिओ प्लँटफॉर्म) आणि गुगल एलएलसीने (गुगल)  जिओ प्लँटफॉर्ममध्ये 33, 737 कोटी रुपयांचा गुंतवणुकीचा करार केला आहे. गुगलने जिओ प्लँटफॉर्मचे मूल्य 4.36 लाख कोटी निश्चित केले आहे. गुगल या गुंतवणुकीच्या माध्यमातून जिओ प्लँटफॉर्ममधील 7.73 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून जिओ प्लँटफॉर्ममध्ये आतापर्यंत 1,52,056 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

गुंतवणुकीमुळे जिओ आणि गुगलकडून आधी घेण्यात आलेल्या परिश्रमाचा फायदा संपूर्ण भारताला होणार असून डिजिटलायझेशनचा प्रत्येक भारतीयाला फायदा मिळणार आहे. याचा सध्या इंटरनेट वापरत असलेल्या 50 कोटींहून अधिक लोकांना फायदा मिळणार आहे. जिओ प्लँटफॉर्म आणि गुगलमध्ये आणखी एक कमर्शिअल करार झाला असून, त्यानुसार किफायतशीर अशा “एंट्री लेव्हल”  स्मार्टफोनची निर्मिती करण्यात येणार असून ज्यामध्ये एन्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम आणि प्ले स्टोअरचा समावेश असेल. लाखो भारतीयांना किफायतशीर स्मार्टफोन देण्यासाठी एकत्रितपणे उत्सुक आहोत. या एकत्रित प्रयत्नांमुळे नवीन संधी खुल्या होणार असून एक वायब्रन्ट

नाविन्यपूर्ण इकोसिस्टीम तयार होईल. ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा गती मिळणार आहे.

श्री.मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, ” गुगलने लाखो भारतीयांना महत्वाची माहिती उपलब्ध करून  दिली आहे  आणि जिओने ती अत्यंत जलदगतीने पोचविली आहे. आम्ही गुगलचे स्वागत करतो आणि आमच्या भागीदारीमुळे लाखो भारतीयांना याचा लाभ पोचविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असून भारताच्या आर्थिक गतीला अधिक ताकद मिळणार आहे. एकत्रितपणे नवीन डिजिटल इंडियाला घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू अशी आशा करतो.”

श्री.सुंदर पिचई, गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणाले, ” रिलायन्स इंडस्ट्रीजला आणि मुख्यतः जिओ प्लँटफॉर्मला भारतातील डिजिटल बदलाचे श्रेय जाते. भारतात झालेला मोठा डिजिटल बदल बघून आम्ही भारावलो आहोत. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाला चांगले उत्पादन देण्याचा आमचा मानस आहे. गुगल जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही एकत्रित काम करायला उत्सुक असून ज्या लाखो भारतीयांकडेअजूनही स्मार्टफोन नाही अशा लोकांना किफायतशीर स्मार्टफोन उपलब्द करून देण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहोत.

जिओ प्लँटफॉर्म ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असून पुढच्या पिढीचा आघाडीचा तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारा मंच आहे. भारतामध्ये उच्च दर्जाच्या आणि किफायतशीर डिजिटल सेवा पुरविण्याचे कार्य करते. सध्या जिओचे 38.8 कोटी ग्राहक आहेत. डिजिटल इकोसिस्टिम पुरविण्यासाठी जिओने गुंतवणूक केली असून ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, स्मार्ट डिव्हाईस, क्लाउड अँड एज कॉम्प्युटिंग, बिग डेटा ऍनालिटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ऑगमेंटेड अँड मिक्स रिऍलिटी अँड ब्लॉकचेन तंत्रज्ञान पुरविते. जिओचे डिजिटल इंडिया बनविण्याचे स्वप्न असून 1.3 अब्ज लोकांना आणि देशभरातील व्यवसायांना, लहान व्यापारी आणि सूक्ष्म आणि लघु व्यवसायिक आणि शेतकऱ्यांपर्यंत फायदा पोचविण्याचा मानस आहे.  रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड 38.8 कोटी ग्राहकांना दूरसंचार सेवा उपलब्ध करून देते. ती जिओ प्लँटफॉर्मची उपकंपनी आहे.

नियामक मंडळ आणि इतर विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर करार पूर्णत्वास येईल.

मॉर्गन स्टँनलेने रिलायन्स इंडस्ट्रीजचे फायनान्शियल   ऍडव्हायझर म्हणून तर एझेडबी अँड पार्टनर्स आणि डावीस पोल्क अँड  वॉर्डवेलने कायदेशीर बाजू हाताळली आहे.

लॉ फार्म फ्रेशफिल्ड ब्रूकखाऊस डेरिंगर यूएस एलएलपी आणि जे. सागर असोसिएटने गुगलला व्यवहारासाठी मार्गदर्शन केले आहे.