गांधीवरील हल्ल्याचा गोवा महिला काँग्रेसतर्फे निषेध

0
1054

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर गुजरात मध्ये झालेल्या हल्ल्याचा गोवा महिला काँग्रेसने केला निषेध.महिला पदाधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या बांगड्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पाठवून आमचा निषेध कळवणार असल्याचे महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपचे नेते घाबरले असल्याने आमच्या नेत्यांवर हल्ल्यासारखे भ्याड हल्ले केले असल्याचा आरोप कुतीन्हो यांनी केला.