गांजा बाळगल्या प्रकरणी पं. बंगालच्या पर्यटकास अटक
गोवा:कळंगुट पोलिसांनी ड्रग्स विरोधातील आपली धडक मोहीम कायम राखत गांजा बाळगल्या प्रकरणी पं. बंगाल येथील पर्यटकाला अटक केली.
पं. बंगाल मधील महाबीर मोंडाल हा 32 वर्षीय युवक कळंगुट पार्किंग येथील मासळी बाजाराजवळ पर्यटकांना ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची पक्की खबर प्राप्त झाल्यानंतर कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी आपल्या नेतृत्वाखाली पथक नेमुन काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मासळी बाजारा जवळ सापळा रचला.रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोंडाल हा ड्रग्स विकण्यासाठी कळंगुट मासळी बाजारा जवळ आला असता त्याला कळंगुट पोलिसांनी 290 ग्राम गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 30 हजार रुपये आहे.या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक, पोलिस हवालदार दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर आणि गौरेश रेडकर यांचा समावेश होता.