गांजा बाळगल्या प्रकरणी आसामच्या तरुणास अटक

0
848
 गोवा:कळंगुट पोलिसांनी ड्रग्स विरोधात कारवाई करून 15 हजार रुपये किंमतीचा गांजा बाळगल्या प्रकरणी आसाम येथील राहूल शहा या 21 वर्षीय युवकाला अटक केली. ही कारवाई 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.राहुल हा गांजा घेऊन ग्राहकांना विकण्यासाठी कळंगुट येथील बांदोडकर पूतळ्या जवळ संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती.पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली  पथक नेमून टाकलेल्या धाडीत राहुलला 150 ग्राम गांजासह अटक करण्यात आली.या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर, पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर आणि इतर स्टाफ सहभागी झाला होता.