गरज भासल्यास पक्ष निर्णय घेईल : आयुषमंत्री

0
1924

 

गोवा खबर:मुख्यमंत्री आजारी असले तरीही ते प्रशासनाचे कामकाज चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. असे असताना सध्या तरी नेतृत्व बदल करण्याची गरज नाही. तशीच गरज भासली तर पक्ष त्यावर निर्णय घेईल असा आपल्या म्हणण्याचा अर्थ होता असे नेतृत्व बदलासंबंधी वर्तमान पत्रांमध्ये आलेल्या वक्तव्यासंबंधी आयुषमंत्र्यांनी म्हटले आहे.

गोव्यात १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या अंतराष्ट्रीय योग परिषदेची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या एका अवांतर प्रश्नाला श्रीपाद नाईक यांनी वरील अर्थाने उत्तर दिले होते. कदाचित ते समजून घेताना काही जणांचा गैरसमज झाला असावा, त्यामुळे काही दैनिकांमध्ये विपर्यस्त अर्थाने बातम्या छापल्या गेल्या असाव्यात असे वरील विषयावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काही इंग्रजी आणि स्थानिक भाषांतील दैनिकांमध्ये बातमीतील मसुद्यात मला जे म्हणायचे होते ते तशाच पद्धतीने छापून आले आहे. पण काहींमध्ये थोडेसे विपर्यस्त वक्तव्य आल्याने अनेकांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे हे स्पष्टीकरण देण्यात येत असल्याचे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे.