गणेश भक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल मुख्यमंत्र्यानी जाहिर माफी मागावी :अमरनाथ पणजीकर

0
548
गोवा खबर :गोव्यात चतुर्थी उत्सवात सहभागी होऊन कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास  गणेश भक्त जबाबदार असल्याचे बेजबाबदार वक्तव्य करून   मुख्यमंत्र्यानी तमाम  गणेश भक्तांच्या भावना दुखवल्या आहेत. प्रमोद सावंतानी आता सर्व गणेश भक्तांची जाहिर माफी मागावी, अशी मागणी काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. 

आता लोकांना दोष देणारे मुख्यमंत्री व भाजपचे पदाधिकारी संपुर्ण देशात लाॅकडाऊन असताना व्हर्चुअल रॅली व उत्सव साजरे करण्यात मग्न होते व त्यामुळेच कोविड महामारीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास ते अपयशी ठरले त्यानी लक्षात ठेवावे,असे पणजीकर म्हणाले.
लाॅकडाऊन काळात सामान्य माणुस जीवनावश्यक वस्तु शोधत फिरत असताना, भाजप सरकारचे मंत्री व कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करण्यात मग्न होते,असा आरोप करून पणजीकर म्हणाले, वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ सामाजीक चाचणी करण्याचा सल्ला देत होते त्यावेळी हेच मुख्यमंत्री सामाजीक सर्वेक्षण करण्याच्या हट्टाला पेटले होते. अर्थव्यवस्था कोसळल्याने हवालदील झालेला सामान्य व्यापारी मदतीची याचना करीत असताना भाजप सरकार जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेण्याची तयारी करीत होते.
पणजीकर म्हणाले,गोव्यातील गरीब वृद्ध, विधवा, दिव्यांग व्यक्ती जेव्हा जवळ जवळ सहा महिने आपल्या मासीक पेंशनची वाट पाहत होते तेव्हा हेच प्रमोद सावंत कोटी कोटी खर्च करुन नवे राजभवन, विधानसभा संकुलाचे नुतनीकरण तसेच पर्रिकरांची समाधी बांधुन, प्रकल्पांच्या खर्चावर कमिशन खाण्याचे स्वप्न पाहत होते.
आज कोविड हाताळणीत सपशेल फसलेल्या मुख्यमंत्री व भाजप सरकारला लोकांना दोष देण्याचा कोणताच अधिकार नाही. गोव्याचे कोविड डेस्टिनेशन करण्यास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत,असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.