गडकरींनी खाणमंत्र्यांना गोव्यात आणून खाणप्रश्न सोडवावा:लोबो

0
839

  • गोवाखबर:केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे गोवा आणि केंद्र सरकार मधील दुवा आहेत.खाणी बंद पडल्यानंतर गोव्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे.लाखो लोक बेकार होणार असून त्यातून परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याने गोव्यात भाजप आघाडी सरकार बनवण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खाण मंत्र्यांसह गोव्यात येऊन आघडीतील सर्व पक्ष प्रमुखांसह आमदारांशी चर्चा करून खाण प्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी उपसभापती मायकल लोबो यांनी आज केली.
    खाणप्रश्न 15 मार्च नंतर गंभीर होणार आहे,यापार्श्वभूमिवर लोबो यांनी आपली भूमिका मांडली. लोबो यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे दिल्लीत जाऊन भेटणे चुकीचे ठरवले.लोबो म्हणाले,खर तर विधानसभेत ठराव घेऊन मगच दिल्लीत जायला हवे होते.आता गडकरींनी खाण मंत्र्यांसह गोव्यात येऊन आघडी सरकार मधील सगळ्या पक्ष प्रमुखांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत.खाणी बंद झाल्या तर त्यावर अवलंबून असलेले लाखो लोक बेकार होणार आहेत.या लोकांच्या सरकारकडून खुप अपेक्षा आहेत.येत्या महिन्या भरात तोडगा निघाला नाही तर परिस्थिती चिघळेल. गोवा सरकारला मिळणारा करोड़ो रूपयांचा महसुल बुडणार आहे.गोव्यावर एक प्रकारचे आर्थिक संकट ओढवणार असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
    मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गडकरी यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून त्यांना गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असेही मत लोबो यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांच्या समितीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधुन कॅबीनेट मध्ये हा विषय घ्यावा असे लोबो म्हणाले.