ख्रिसमससाठी गोवा सज्ज

0
2578
गोवा खबर:देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला गोवा ख्रिसमससाठी सज्ज झाला आहे.लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले असून किनारे गजबजुन गेले आहेत.आज मध्यरात्री ख्रिसमससाठी ठीकठीकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा होणार आहेत.त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत गोव्यात सेलिब्रेशनचा मुड पहायला मिळणार आहे.
स्थानिक गोमंतकीयां सोबत दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येत असतात.यंदा देखील लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.किनारे आणि हॉटेल्स हाउसफुल झाली असून सर्वत्र सेलिब्रेशनच्या पार्टया आयोजित केल्या जात आहेत.
आज मध्यरात्री ठीकठीकाणच्या चर्च मध्ये ख्रिसमस निमित्त विशेष प्रार्थना सभा होणार आहेत.त्यानंतर ख्रिसमस पार्टया होणार असून माहौल खुशनुमा झाला आहे.
बागा येथील हबाना रिसोर्टचे मालक गगन सिंग म्हणाले,यंदा ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोव्यात आले आहेत.पर्यटकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.यंदा बुकिंग 100 टक्के झाल असून फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्या पर्यंत रिसोर्ट फूल आहे.मोरजी मधील आमचा शॅक देखील रशियन पर्यटकांनी फुलून गेला आहे.
बाजारपेठात ख्रिसमस साहित्य आणि मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.ठीकठिकाणी गोठे सजवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.