ख्रिश्चन बांधवांनी भक्तीभावाने पाळला माँडी र्थस्डे

0
951

गोवा:जगभराप्रमाणे काल गोव्यात देखील ख्रिश्चन बांधवांनी भक्तीभावाने माँडी र्थस्डे पाळला. येशूच्या सुळावर चढण्यापूर्वीच्या शेवटच्या जेवणाचा दिवस म्हणून माँडी र्थस्डे पाळला जातो.गुड फ्रायडे पूर्वी गुरुवारी धर्मगुरु 12 जणांचे पाय धुवून हा दिवस पाळतात.येशूच्या मानवतावादी वागणूकीचे स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो.येशूने कालच्या दिवशी 12 शिष्याचे पाय धुवून शेवटचे जेवण घेतले होते.त्या नंतर त्याच रात्री येशूला सुळावर चढ़वण्यात आले होते.जून गोवे येथील चर्च मध्ये झालेल्या सोहळ्याला गोव्याच्या आर्च बिशपांनी उपस्थिती लावून सोहळा पार पाडला.