खोल पंचायतीला इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळल्याने उपमुख्यमंत्री  कवळेकरांचे अभिनंदन

0
205
गोवा खबर:खोल पंचायतीला इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळल्यामुळे खोल जिल्हा पंचायत आजी माजी सदस्य व राज्य भाजपच्या अनुसुचीत जमातीचे अध्यक्ष यांनी  सर्व खोल ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर तसेच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत. 
यावेळी खोलचे जिल्हापंचायत सदस्य शाणू वेळीप व माजी जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप उपस्थीत होते. त्यांच्या सोबत भाजपचे राज्य अनुसूचित जमातीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर हेही उपस्थित होते.
राज्यात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून ९९ त्यातले जवळपास सर्वच आता त्या यादीतून काढले गेले आहेत. खोल गाव हा केपे मतदार संघात येतो आणि आधीपासूनच हा गाव इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळावा अशी मागणी होत होती. त्याचा पाठपुरावा करत स्थानिक आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे याचा सातत्याने पाठपुरावा करत वगळण्यात आलेल्या प्रभागात खोल गावचा समावेश करून करून घेतला होता.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांचे आभार प्रकट करत असताना अनुसूचित जमातीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर म्हणाले , जरी खोल गाव काणकोण तालुक्यात येत असला तरी तो केपे मदार संघात मोडतो आणि गेली कित्येक वर्षे रखडलेली जनतेची हाजी मागणी उपमुख्यमंत्री  कवळेकर यांच्या प्रयत्नांनी शक्य झाली. इको सेन्सिटिव्ह भाग म्हणून जाहीर झाला असता तर या भागात कसलिही विकास कामे करायला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले असते असे शेवटी  गावकर म्हणाले.