खेलो इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून गोल्ड, मेरी कोम, भाग मिल्खा भाग, 1983, एसएसडी-द अनटोल्ड स्टोरी आणि सूरमा हे चरित्रपट इफ्फीत दाखवले जाणार

0
1046

 चित्रांगदा सिंगरिमा कागटी आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासह

अन्य चित्रपट निर्माते-दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांचे प्रतिनिधीत्व करणार

 

 

गोवा खबर:खेलो इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खेळाडूंनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा उद्देश आहे. या महोत्सवात मोकळ्या जागेवर मोठ्या पडद्यावर हे क्रीडाविषयक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. क्रीडा चरित्रपटावर आधारित गोल्ड, मेरी कोम, भाग मिल्खा भाग, 1983, एमएसडी-द अनटोल्ड स्टोरी आणि सूरमा हे सहा चित्रपट या विभागात समाविष्ट आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी चित्रपटाचे कलाकार आणि निर्माते-दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन समारंभाला अक्षयकुमार उपस्थित राहणार असून सूरमाची निर्माती चित्रांगदा सिंग, सूरमाचे दिग्दर्शक शाद अली, गोल्डच्या दिग्दर्शक रिमा कागटी, भाग मिल्खा भागचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, 1983 चे दिग्दर्शक अब्रिद शाईन यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पणजीच्या अल्तिनो येथील जॉगर्स पार्कची यासाठी निवड करण्यात आली असून सर्व चित्रपटप्रेमी आणि सामान्य नागरिकांसाठी हे खुले आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.