खासदारनिधीचा वापर शैक्षणिक कामांसाठी करण्यास प्राधान्य:श्रीपाद नाईक

0
862

गोवा खबर:शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नाही तर आयुष्याला दिशा देण्याचे कार्य होते. देशाची समर्थ भावी पिढी घडवण्याचे कार्य शाळा करते. त्यामुळे खासदारनिधीचा जास्तीत जास्त वापर शैक्षणिक कामांसाठी करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज म्हापसा येथील सेंट ऎँथनी माध्यमिक शाळा आणि जनता प्राथमिक विद्यालयाच्या नवीन वर्गखोल्यांचे उदघाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. दोन्ही शाळांच्या वर्गखोल्यांसाठी अनुक्रमे 36 लाख आणि 23 लाख रुपये खासदारनिधीतून देण्यात आले आहेत.

शालेय जीवनात मिळालेले संस्कार आयुष्यभर टिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक जीवनातही योगदान देण्याची भूमिका ठेवावी. शाळा म्हणजे देशाचा आधारस्तंभ, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

1965 मध्ये शिक्षणापासून कोणताही गट वंचित राहू नये म्हणून जनता विद्यालय सुरु करण्यात आले. अशाप्रकारच्या संस्थांना प्रोत्साहन देण्याची आपली नेहमीच भूमिका असल्याचे श्री नाईक आपल्या भाषणात म्हणाले.