खासगी इस्पितळातील अतिदक्षता विभागातील २० टक्के खाटा कोविडसाठी आरक्षित करण्याचा आदेश  त्वरित मागे घ्या : दिगंबर कामत

0
338
गोवा खबर: गोव्यातील सर्व खासगी इस्पितळातील २० टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्याच्या आदेशाने गोव्यातील लोकांमध्ये व खास करुन कोविडेतर रुग्णांमध्ये भय निर्माण झाले आहे. सरकार प्रत्येक खाटी पर्यंत कोविड नेण्याचा विचार करतो का असा संतप्त सवाल करत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी सदर आदेश ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. 
खासगी इस्पितळांत कोविड रुग्णांची भरती केल्यास इतराना त्यांचा संसर्ग होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार असा सवला  कामत यानी केला आहे.

सरकारने कोविड हाताळणी बद्दल कृती आराखडा लोकांसमोर ठेवून सरकारने कोविडवर श्वेतपत्र जारी करावी,अशी मागणी कामत यांनी केली आहे.
सरकार  दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा पुर्णपणे वापर करण्यास अपयशी ठरले आहे. मु्ख्यमंत्र्यानी पंतप्रधान कोविड केअर मधुन निधी मागवुन, सदर इस्पितळाचे सर्व विभाग पुर्णपणे चालीस लावावेत अशी मागणी  कामत यानी केली आहे.
सरकारने वैद्यकिय क्षेत्रातील सर्व सबंधिताना विश्वासात घेऊन, दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोविडसाठी प्रत्येकी एक इस्पितळ अधिकृत करावे. सरकारने गोव्यातील सर्व खासगी इस्पितळांत कोविड रुग्णांसाठी खाटी राखीव ठेवण्याच्या आदेशाने लोकांमध्ये भय व संभ्रम निर्माण झाला आहे. गोव्यात सध्या बंद असलेले काही इस्पितळ प्रकल्प आहेत, सरकारने ते ताब्यात घ्यावेत व कोविड रुग्णांसाठी त्यांचा वापर करावा,अशी सूचना कामत यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यानी जाहिर केलेले २०० व्हेंटिलेटर तसेच कोरोंटायनसाठी २० हजार खोल्यांचे काय झाले असा प्रश्न दिगंबर कामत यानी विचारला आहे. कोरोना लाॅकडाऊन काळात गोवा सरकारने कोविड सुविधा तयार करण्यास कसलेच प्रयत्न केले नाहीत हे आजच्या परिस्थीतीवरुन स्पष्ट होते,असे कामत म्हणाले.
गोव्यातील बहुतेक खासगी इस्पितळे लहान आहेत. अतिदक्षता विभागात त्यांच्याकडे केवळ ३ ते ४ खाटा असतात. सदर इस्पितळांतील खोल्यांची संख्याही जेमतेम पंधरा ते विस खोल्यांची असते. गोव्यातील विवीध भागातील लोकांनी आपल्याला फोन करुन सरकारी निर्णयाने इतर रुग्णाना त्रास होऊ शकतो हे सांगीतले. प्रसुतीशास्त्र, नेत्रचिकीस्ता तसेच जनरल मेडिसीनचे उपचार करणाऱ्या इस्पितळात कोविड रुग्ण भरती झाल्यास सदर इस्पितळात इतर सर्वसाधारण रुग्ण भरती करुन घेण्यास घाबरतील असे  कामत म्हणाले.