खादी आणि ग्रामोद्योग उत्पादन निर्यातीत मध सर्वोच्च स्थानी

0
892

गोवा खबर:खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत गेल्या दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे.  2016-17 या वर्षात 52,138.21 कोटी रुपये मुल्याच्या उत्पादनांची विक्री झाली होती. 2017-18 या वर्षात 59,098.04 कोटी रुपये मुल्याच्या उत्पादनांची विक्री झाली.

खादी आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावरील औद्योगिक मंडळे तसेच जिल्ह्यांमधील औद्योगिक केंद्राच्या माध्यमातून उत्पादनांची निर्यात केली जाते. युरोपियन,आशियाई आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये प्रामुख्याने या उत्पादनांची निर्यात होते. यात मध हे उत्पादन अग्रस्थानी असून 2016-17 या वर्षात 13,349.03 लाख रुपये तर 2017-18 या वर्षात 13,627.15 लाख रुपये मुल्याच्या मधाची निर्यात नोंदवली गेली.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गिरीराज सिंग यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.