खाते प्रमुखांना सक्रीयतेने कार्य करण्याचे मुख्यंत्र्यांचे आवाहन

0
299

 

गोवा खबर:सचिवालय येथे आयोजित तीन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विविध विभागांच्या प्रमुखांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना लोक सेवेत सक्रियतेने कार्य करा असे आवाहन केले.

 जेव्हा आंतरखात्याचे स्पष्ट संवाद असतील तेव्हा सरकारी यंत्रणा सुरळीतपणे कार्य करू शकेल. राज्याला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर किंवा स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजना दुर्गम भागात आणि गरजूंपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जेव्हा प्रत्येक खात्यामध्ये दृष्टी,उद्दीष्ट आणि रोडमॅप तयार असेल तेव्हाच हे शक्य होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच खात्यातील प्रमुख व्यक्तींची निवड करून त्यांच कार्य साध्य करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी खाते प्रमुखांना दिले.

  नियोजन, सांख्यिकी व मूल्यमांपन संचालनालयामार्फत १९ शासकीय खात्यांच्या प्रमुखांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. श्रीमती सीमा फर्नांडीस, डॉ. स्मिता श्रीवास्तव, श्री. दत्तप्रसाद शेटकर, श्री. प्रणव भट, श्रीमती. मनोरमा आणि श्री आश्विनी मोहपत्रा, आयएएस श्री. जे अशोक कुमार यांनी  स्वयंपूर्ण गोवा, सक्षम विकासाचे उद्दीष्ट, आत्मनिर्भर भारत,लेखा प्रणाली/ वित्त व्यवस्थापन आणि व्हिजन डॉक्युमेंटबद्दल प्रशिक्षणार्त्यांना प्रशिक्षण दिले.