खाण अवलंबीत आक्रोश करत असताना बाइक  रॅली काढून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या भाजपचा निषेध :नाईक

0
1290
गोवाखबर:उसगाव येथे मोठ्या संख्येने एकत्र जमून बंद असलेल्या खाणी सुरु होत नाहीत म्हणून आक्रोश करत असलेल्या खाण अवलंबीतांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून कुडचडे-सावर्डे मधील रस्त्यावर बाइक रॅली काढून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या भाजपचा शिवसेनेच्या प्रवक्ता राखी प्रभूदेसाई नाईक यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
नाईक यांनी खाणी बंद पाडण्याचे पाप भाजपनेच केल्याचा आरोप केला आहे.नाईक म्हणाल्या,खाण अवलंबीतांना देशोधडीला लावण्याचा सगळ्यात मोठा गुन्हा भाजपने केला आहे.2012 पर्यंत सुरळीत सुरु असलेल्या खाणी मनोहर पर्रिकर यांनी राजकीय फायदा उठवून निवडणुका जिंकण्यासाठी बंद पाडल्या.
2012 पासून खाणींसाठी कठीण काळ सुरु झाला आहे.भाजप आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सोबत निष्फळ बैठका घेऊन आणि दिल्ली वाऱ्या करून वेळ मारून नेत आहे.भाजपने अध्यादेश काढून आपला शब्द पाळला नसल्या बद्दल नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
कुडचडे, सावर्डेसह गोव्यातील लाखो खाण अवलंबीत खाणी सुरु होत नसल्याने संकटात असताना भाजप कार्यकर्ते केंद्रातील मोदी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाली म्हणून बाइक रॅली काढून आनंदोत्सव साजरा करतात याचे आश्चर्य वाटत असल्याचे सांगून नाईक म्हणाल्या,खर तर भाजप कार्यकर्त्यांनी उसगाव येथील खाण अवलंबीतांच्या सभेला हजेरी लावून त्यांच्या समस्या,त्यांचे दुःख जाणून घेतले पाहिजे होते.भाजपच्या चुकीच्या राजकारणामुळे लाखो लोक बेकार झाले असून आता देखील भाजपला खाण अवलंबीतांचे काही पडून गेलेले नाही याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आहे.
उसगाव मध्ये हजारो खाण अवलंबीत खाणी सुरु होत नसल्याने वीवंचनेत असताना भाजपचे कार्यकर्ते सावर्डे आणि कुडचडे मध्ये बाइक रॅलीवेळी हसरे चेहरे करून सेल्फी काढण्यात गूंग होते असा आरोप नाईक यांनी केला आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला 4 वर्षे झाली म्हणून आनंदोत्सव साजरा करण्या ऐवजी खरे तर खाणी सुरु करण्यात मोदी सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल त्यांचा निषेध करायला हवा,असे नाईक म्हणाल्या.
नाईक म्हणाल्या,शिवसेना सदैव खाण अवलंबीतां सोबत असणार आहे.खाणी पुन्हा सुरु होई पर्यंत शिवसेना खाण अवलंबीतांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे.त्याशिवाय शिवसेनेचे नेते या विषयावर केंद्र सरकारचे लक्ष वेधतील शिवाय संसदेत देखील आवाज उठवतील.