खाण अवलंबीतांच्या उद्याच्या ‘बंद’ला शिवसेनेचा पाठिंबा  

0
999
 गोवा खबर: खाण उद्योग पूर्ववत सुरू होण्याची मागणी लावून धरण्यासाठी खाण अवलंबीतांनी उद्या २६ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या ‘बंद’ला शिवसेनेने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. खाण उद्योग बंद झाल्यापासून त्यातील कामगार व त्यावरील अवलंबितांची जी परवड चालू आहे त्याची जाण असल्याने शिवसेनेचे केंद्रातील व गोव्यातील नेते त्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. 
  गेल्या डिसेंबर मध्ये नवी दिल्लीतील रामलीला मैदान व जंतर मंतर या दोन ठिकाणी झालेल्या निषेध बैठकांच्या वेळी शिवसेनेचे नेते खाणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. संसदेचे कामकाज काही कारणाने स्थगित झाले नसते तर खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यमान खाण कायद्यांमधे दुरुस्ती करण्याचा प्रश्न शिवसेनेला संसदेत उपस्थित करता आला असता.
 
       गेले वर्षभर खाणग्रस्तांची परवड चालू असल्याने त्यांच्या भावनांशी खेळणे गोवा भाजपने आणि या पक्षाच्या केंद्रातील नेत्यांनी थांबवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडे आपली नाराजी व्यक्त करण्याचा निर्णय खाणग्रस्तांनी घेतलेला असूनही भाजप त्याची कोणतीही दखल घेत नसल्याने खाण अवलंबीतांमधील असंतोष वाढीस लागला असून भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा शिवसेना उपराज्यप्रमुख राखी प्रभूदेसाई यांनी दिला आहे.
   नाईक म्हणाल्या,   निषेध म्हणून आणि ताकद दाखवण्यासाठी उद्या आयोजित करण्यात आलेल्या ‘बंद’ला शिवसेना संपूर्ण पाठिंबा देणार आहे. जनता हाल अपेष्टा भोगत आहे असा स्पष्ट संदेश सत्ताधाऱ्यांच्या जाण्यासाठी ‘बंद’ शांततापूर्ण होण्याची नितांत गरज आहे. ‘बंद’च्या काळात कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला शिवसेनेचा विरोध असल्याने सेना
खाणग्रस्तांबरोबर राहणार आहे.
 खाण उद्योग पूर्ववत सुरू होईपर्यंत शिवसेना त्यांच्यासोबत राहील, असे ठाम आश्वासनही सेनेतर्फे देण्यात आले आहे.