खत नियंत्रण आदेशामध्ये शेतकऱ्यांना खताचा योग्य आणि पुरेसा पुरवठा करण्याची तरतूद- राव इंद्रजित सिंह 

0
1541

गोवा खबर:शेतकऱ्यांना खताचा पुरेसा आणि योग्य पुरवठा व्हावा यासाठी सरकारने त्याला अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना खताचा पुरेसा पुरवठा होत असून प्रमाणित मानकांनुसार नसलेल्या खतांची विक्री किंवा उत्पादन यावर बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या कायद्यानुसार निश्चित मानकांप्रमाणे दर्जेदार खताचा पुरेसा पुरवठा व्हावा हे सुनिश्चित करणे राज्य सरकारांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. खत नियंत्रण कायद्याच्या आदेशात यासाठी पुरेशा तरतुदी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही राज्य सरकारकडून खतांच्या अनधिकृत विक्रीविषयी कुठलीही माहिती नाही असे राव इंद्रजित सिंह यांनी आज लोकसभेत सांगितले.