खंडित वीजपुरवठयाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आरती आंदोलन

0
1022
गोवा खबर:ऐन गणेश चतुर्थी मध्ये खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज खात्याला आलेल्या अपयशाचा निषेध करत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वीज खात्याच्या मुख्यालयावर धडक देत अनोखे आरती आंदोलन केले.
राज्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठयामुळे भाविक त्रस्त आहेत.वीज खात्याकडे तक्रार करून देखील वीजेची समस्या सुटत नसल्याने लोकांना अंधारात गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे.
युवक काँग्रेसने हा विषय घेऊन आज पणजी येथील वीज खात्याच्या मुख्य कार्यालयावर धडक मारली.युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वरद म्हार्दोळकर,जनार्दन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.घेराव आंदोलनावेळी अधिकारी जागेवर उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मेणबत्या,टॉर्च पेटवत घूमट, शामेळाच्या तालावर आरत्या म्हणत वीज खात्याच्या कारभारा बद्दल नाराजी व्यक्त केली.