लोक मरेनात, भाजपसाठी केवळ निवडणुका महत्वाच्या : सिटीझन्स फॉर डेमोक्रसी

0
124
गोवा खबर : कोविड महामारी राज्यात थैमान घालीत असताना भाजप केवळ निवडणुका जिंकण्यास कार्यरत असल्याच्या कारणावरून सिटीझन्स फॉर डेमोक्रसी ह्या एका नागरिकांच्या गटाने भाजप सरकारवर हल्ला चढवला. एल्व्हिस गोम्स यांच्या उपस्थितीत एका व्हिडिओ संदेशात गटनेते प्रदीप पाडगावकर यांनी सरकार महामारी हाताळण्यासाठी ठोस पावले उचलत नाही असा आरोप केला.
निवडणूक सभांना परवानगी देताना सरकारच्या ढोंगीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत: अशा सभेला संबोधित केले याचं उदाहरण सांगितलं ज्यात बहुतेक मास्क नसलेले सुमारे 200 लोक उपस्थित होते. ते म्हणाले की, गेल्या 11 दिवसांपासून टॅक्सी मालक/चालकांच्या संपावर तोडगा काढण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात टॅक्सीवाले व त्यांचे कुटूंब संपात सामील होऊन मोठ्या संख्येने एकत्र जमतात त्याने सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो व त्यास सरकार  कारणीभूत ठरेल. पाडगावकर म्हणाले की, सध्याच्या संकटाच्या वेळी लोकांच्या मदतीसाठी योग्य ते पाऊल उचलले गेले नसून केवळ भाजपाच्या राजकीय हितासाठी सरकार चालवले जात आहे.
“विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी अनिश्चितता कायम आहे. इयत्ता अकरावीची परीक्षा घेऊ नये म्हणून हायर सेकंडरी प्राचार्यांच्या फोरमच्या विनंत्या बहिऱ्या कानांवर पडत आहेत. सरकार लोकांच्या जीवाशी जुगार खेळत आहे” असे मत पाडगावकर यांनी व्यक्त केले. कोविड संसर्ग होण्याच्या वाढत्या घटनांनंतरही कॅसिनोमध्ये जूगार चालू आहे. गेल्या निवडणुकांमध्ये कॅसिनो हटवण्यासाठी वचनबद्द असलेल्या राजकीय पक्षासह ईतर सर्व राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने कॅसिनो हटविणे हा एक मोठा मुद्दा बनविला होता, याची त्यानी यावेळी आठवण करुन दिली.
कोविड बाधितांची संख्या वाढत आहे, पोझिटीव झालेले घरांत क्वारेंटांईन आहेत त्याना वेगवेगळ्या मदतीची गरज आहे. भाजपचे आमदार, पंच आणि नगरसेवकांनी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी कोविड लोकडाऊन दरम्यान लोकांना दिलासा मिळवून देण्यास कसे तत्पर आहोत असे दाखवित राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्या आठवणींना ऊजाळा देत, लोकांच्या मदतीची आवश्यकता असताना हे लोक आता कुठे लपले आहेत असा प्रश्न प्रदीप पाडगावकर यानी  केला.