क्रिकेटपटू श्रीसंतवरील बंदी उठवण्याचे आदेश

0
913

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी झेलत असलेला क्रिकेटपटू एस. श्रीसंतला केरळ हायकोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवर घातलेली आजीवन क्रिकेटबंदी उठवावी, असे  आदेश आज केरळ हायकोर्टाने बीसीसीआयला दिले आहेत.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने २०१५मध्येच मला दोषमुक्त केले असतानाही बीसीसीआयकडून आजीवन क्रिकेटबंदी मागे घेण्यात आलेली नाही, असे श्रीसंतने केरळ हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले होते. या याचिकेवर आज निकाल देत हायकोर्टाने श्रीसंतला दिलासा दिला.

केरळ हायकोर्टाकडून बंदी उठवण्यात आल्यानंतर श्रीसंतने ट्विटरवरून ‘गॉड इज ग्रेट’ म्हणत चाहत्यांचं प्रेम आणि पाठबळाबद्दल आभार मानले आहेत.