क्रिकेटचा देव जांबावलीत दामोदराच्या दर्शनाला

0
4876
सचिन तेंडुलकरने गोव्यात घेतले देव दामोदराचे दर्शन
गोवा खबर:मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज अचानक गोव्यात येऊन जांबावली येथील प्रसिद्ध दामोदर देवस्थानात जाऊन दर्शन घेतले.दामोदर देवस्थानचा सचिन निस्सीम भक्त आहे.आज सायंकाळी सव्वा सात वाजता सचिनने आपल्या मित्रा सोबत देवस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेतले.
सचिन तेंडुलकर गोव्यात अनेकदा येत असतो.दक्षिण गोव्यातील मार्टिन कॉर्नर मधील सी फूड त्याला प्रचंड आवडते.त्याशिवाय सचिन गोव्यात आला की देव दामोदराचे दर्शन घेतल्या शिवाय जात नाही.
आज सायंकाळी सव्वा सात वाजता सचिन सावर्डे येथील आपला मित्र अनूप कुडचडकर सोबत जांबावली येथील दामोदर संस्थान मध्ये आला होता.सचिन ने मंदिरात आल्या नंतर पूजा अर्चना केली आणि देवाला कांबळ अर्पण केले.
सचिनने दामोदर देवस्थानच्या भानुदास राखणदाराला देखील भेट दिली.जवळपास एक तास सचिन देवस्थान परिसरात होता.सव्वा आठच्या सुमारास सचिन देवस्थानातून निघाला अशी माहिती देवस्थानचे सेवेकरी विनोद प्रभाकर जांबावलीकर यांनी दिली.यावेळी सिद्धेश प्रभूदेसाई,देवीदास गुरव, तुषार जांबावलीकर,दामोदर दीपक जांबावलीकर,ताश्कंद जांबावलीकर,विपुल विनोद जांबावलीकर,साईश जांबावलीकर,आनंद जांबावलीकर, किशोर जांबावलीकर,सूरज जांबावलीकर आदि सेवेकरी यावेळी उपस्थित होते.दामोदर देवस्थानचा गुलालोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.क्रिकेट मधून निवृत्त झाल्या नंतर सचिनने अनेकदा या देवस्थानला भेट दिलेली आहे.