कोवीड संकटात आरोग्यमंत्र्यांचा गोंधळ कायम!

0
784
राज्यात कोरोनामुळे मोर्ले येथील वृद्धाचा मृत्यू
गोवा खबर : गोव्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती देताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी नेहमीप्रमाणे गोंधळ घातला.सकाळी आपल्या मर्जी मधील पत्रकारांना पाठवलेल्या ऑडियो मेसेज मध्ये एका महिलेचे कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती त्यांनी दिली.काही वेळाने आपल्या सोशल मीडियावरुन मोर्ले सत्तरी येथील ८५ वर्षे वयाच्या कोरोना बाधित पुरुषाच निधन झाल अस त्यांनी जाहिर केल.यापूर्वी देखील आरोग्यमंत्री राणे यांनी कोरोनाशी निगडीत बातम्या देताना संभ्रम निर्माण करून गोंधळ घातलेला आहे.यावेळी देखील त्यांनी तीच परंपरा कायम राखली.
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या पर्ये मतदारसंघातील मोर्ले येथील 85 वर्षीय वृद्धाची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच आयसीयूत हलवण्यात आले होते. रविवारी त्याची प्रकृती आणखी बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांचे पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचं मडगाव येथील कोविड रुग्णालयात निधन झाल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री राणे यांनी नेहमी प्रमाणे आपल्या खास मर्जी मधील पत्रकारांना पाठवलेल्या ऑडियो मेसेज मध्ये एका 85 वर्षीय वृद्ध महिलेच निधन झाल्याची ब्रेकिंग न्यूज दिली.ही महिला मोर्ले येथील आहे.मोर्ले हा पर्ये मतदारसंघाचा भाग आहे,तरी राणे यांनी तो आपल्या मतदार संघातील असा उल्लेख करत त्याची बातमी खास पत्रकार मित्रांना पूरवली.विशेष म्हणजे मृत व्यक्ती पुरुष असताना त्यांनी बेजबाबदारपणे ती महिला असल्याची चुकीची माहिती आपल्या मर्जी मधील पत्रकार मित्रांना पुरवत गोंधळ घातला.

त्याच ऑडियो वरुन सोशल आणि डिजिटल मीडियाने बातम्या केल्या. अगदी एएनआय सारख्या वृत्तसंस्थेने देखील 85 वर्षीय महिलेचे निधन झाल्याचे आरोग्यमंत्री राणे यांना कोट करून ट्वीट करत बातमी देश भरात पोचवली.त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडियावरुन 85 वर्षीय वृद्ध पुरुषाचे निधन झाल्याचे जाहिर केले. त्यामुळे लोक संभ्रमात पडले.ती महिला होती कि पुरुष आहे?मोर्ले आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे की पर्ये मध्ये अशी विचारणा होऊ लागली.

यापूर्वी देखील पहिल्या कोरोना रुग्णाची ब्रेकिंग देण्याच्या नादात राणे यांनी 3 ऑडियो मेसेज रिलीज करून गोंधळ घातला होता.अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करून चुकीची माहिती द्यायची आणि नंतर ती पोस्ट डिलीट करायची असे प्रकार राणे यांच्या बाबतीत अनेकदा घडले आहेत.
गोव्यात प्रवेश करण्यासाठीची मार्गदर्शक तत्व ठरवायची असताना राणे यांनी ट्वीट करून आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचे सांगत आपले आणि मुख्यमंत्री सावंत यांचे कोरोना सारख्या गंभीर विषयावर देखील एकमत नसल्याचे जगजाहिर केले होते.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि संघटन मंत्री सतीश धोंड यांनी त्याची गंभीर दखल घेत राणे यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.