कोविड-19 ला राष्ट्रीय उद्याने/ अभयारण्ये/ व्याघ्र प्रकल्प यामध्ये कोविड-19ला प्रतिबंध आणि व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे

0
724

 

गोवा खबर:देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव आणि अलीकडेच न्यूयॉर्क येथे एका वाघाला कोविड-19 चा संसर्ग झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय उद्याने/ अभयारण्ये/ व्याघ्र प्रकल्पांमधील प्राण्यांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याची आणि त्याचप्रकारे प्राण्यांकडून मानवामध्ये संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या सूचनांनुसार मंत्रालयाने सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना:

देशातील राष्ट्रीय उद्याने/ अभयारण्ये/ व्याघ्र प्रकल्पांमधील प्राण्यांना या विषाणूचा संसर्ग मानवाकडून आणि प्राण्यांकडून मानवाला होऊ नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यास सांगितले आहे.

वन्यजीवांच्या क्षेत्रात मानवी वावर कमी करावा.

न्यजीवांच्या क्षेत्रात मानवी वावर कमी करावा.राष्ट्रीय उद्याने/ अभयारण्ये/ व्याघ्र प्रकल्प यामध्ये मानवी वावरावर निर्बंध घालावेत.

या परिस्थितीची शक्य होईल तितक्या त्वरेने हाताळणी करण्यासाठी एक कृती दल/ क्षेत्र व्यवस्थापक, प्राण्याचे डॉक्टर, आघाडीवरील कर्मचारी यांच्यासह शीघ्र कृती दलाची स्थापना करावी.

कोणत्याही प्रकरणाची नोंद झाल्यास सहजपणे व्यवस्थापन करण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याचा समावेश असलेली अहोरात्र कार्यरत असणारी माहिती कळवणारी यंत्रणा स्थापन करावी.

गरज पडेल तेव्हा प्राण्यांची तातडीने तपासणी करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यासाठी  अत्यावश्यक सेवांची स्थापना करावी.

विविध विभागांमधील समन्वयकारक प्रयत्नांच्या माध्यमातून आजारावर लक्ष, मॅपिंग आणि देखरेख प्रक्रियांमध्ये वाढ करावी.

राष्ट्रीय उद्याने/ अभयारण्ये/ व्याघ्र प्रकल्पांमध्ये कर्मचारी/पर्यटक/ ग्रामस्थ इत्यादीच्या ये-जा करण्यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या इतर सर्व नियमांचे पालन करावे.

विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत.केलेल्या कारवाईची  पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाला माहिती कळवावी असेही या सूचनांमध्ये म्हंटले आहे.