राज्यातील कोविड-१९ ची सकारात्मक प्रकरणे नोंदवली घेल्याने सरकारने सध्य स्थितीचे पालन केले आहे आणि ते लॉकडाऊन ४.० पर्यंत कायम राहील. नोव्हेल कोविड-१९ चा उद्रेक झाल्यापासून कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे या महामारीच्या काळात लोकांना सोसाव्या लागणा-या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन लागू ठेवण्यासाठी सरकारने अनेक उपायांचा अवलंब केला आणि त्याचे सर्व नागरिकांनी पालन केले आहे. विविध स्तरातील लोकांवर लॉकडाऊनचा परिणाम होऊ नये म्हणून अनेक पावले उचलण्यात आली. राज्याचा आदेश अंमलात आणण्यासाठी जिल्हाधिका-यांनी महत्वपूर्ण भुमिका बजाविली. कोरोना विषाणूचा परिणाम कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी महत्वाची भुमिका बजावित आहेत.
तथापि जेंव्हा भुकंप, चक्रीवादळ आणि कोविड-१९ यासारखी संकटे उद्भवतात तेंव्हा या आपत्तीना तोंड देण्यासाठी तसेच आपत्तीला प्रतिबंध व प्रतिसाद देण्यासाठी तसेच व्यक्ती आणि वाहनांची हालचाल प्रतिबंधित करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापन यंत्रणा महत्वपूर्ण भुमिका बजावितात.
राज्यात कोविड-१९ ला सामोरे जाण्याची संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय गतिमान आणि आव्हानात्मक ठरते. नोव्हल कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून आणि गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी होते की नाही याची खात्री करून घेतली जाते असे मत उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका यांनी व्यक्त केले आहे.
डीडीएमए २००५ खाली जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित खात्याशी समन्वय साधून गृहमंत्र्यालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे ख-या अर्थाने पालन होते की नाही हे पाहिले जात असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. कोविड-१९ विरूध्द लढा देण्यासाठी आणि उपायांचा अवलंब करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांसोबत राज्य कार्यकारी समितींच्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी होते की नाही याचीही खात्री करून घेतली जाते.
वाहतूक सुविधा सुलभ व्हावी म्हणून आणि इतर राज्यातील त्यांच्या समकक्षांशी समन्वय साधण्यासाठी त्यांनी आंतरराज्य अधिका-यांशी सतत संवाद साधला.
राज्य कार्यकारी समितीच्या निर्देशांनुसार उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी सीमेवर अडकून पडलेल्या ट्रकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना त्यांच्या इष्टस्थळी पोहचविण्यासाठी सर्व ट्रकना ट्रांन्झीट परवाना देण्यात आले आणि किराणा, खाद्यपदार्थाच्या वस्तू, औषध, फर्मास्युटिकल वस्तू, एलपीजी, बियाणे आणि खते, पाण्यासाठी रसायने आणि मलनिस्सारण प्रक्रिया व इतर अशा आवश्यक वस्तू तसेच गृहमंत्रालयाखाली परवाना दिलेल्या वस्तूची वाहतूक करणा-या ट्रकना परवानगी देण्यात आली.
त्याचप्रमाणे जिल्हाधिका-यांनी सर्व औषधी तसेच औध्योगिक विभाग व आवश्यक वस्तूंशी संबंधित पूरवठा साखळीसह अन्न पदार्थ, पेट्रोलपंप, एलपीजी पेट्रोलियम आणि गॅस किरकोळ आणि स्टोरेज ऑउटलेट, किराणा, दूध, भाजी, फळे, इस्पितळ आणि सर्वसंबंधित वैध्यकिय अस्थापने सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील उत्पादन आणि वितरण विभाग, दवाखाने, केमिस्ट आणि वैध्यकिय उपकरणांची दुकाने, प्रयोगशाळा, नर्सिंग होम, रूग्णवाहिका इत्यादी घटकांचे कामकाज सुरळित केले. त्याचप्रमाणे डॉक्टर, परिचारिका, पॅरमिडिकल कर्मचारी आणि इतर समर्थन सेवांचे कामकाज सुरळित केले.
तालुका, नगरपालिका आणि नगरपालिका बाहेरील भागातील विशिष्ठ कामांसाठी घटना कमांडरची नियुक्ती करण्यात आली. क्वारंटाईन केंद्रांसाठी आणि संबंधित कार्यक्षेत्रातील सीमा नियंत्रणासाठी प्रमुख म्हणून अधिका-यांचीही नियुक्ती करण्यात आली.
राज्य तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवर एसडीएमएचे सदस्य सचिव तथा महसूल सचिव श्री संजय कुमार, आयएएस यांच्या नेतृत्वाखाली आठवड्यातील २४ तास राज्य नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. शेल्टर होम्स आणि रिलिफ कॅम्प्स सुरू करण्यात आले आणि त्यांच्या देखरेखीसाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.
अडकलेल्या स्थलांतरिताना त्यांच्या मूळ राज्यात पाठविण्यासाठीची प्रक्रिया अगोदरच सुरू करण्यात आली आहे. सुमारे १२२२ मध्यप्रदेशातील स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणारी पहिली श्रमिक एक्सप्रेस कोंकण रेल्वे ८ मे रोजी थिवी रेल्वे स्टेशनवरून ग्वालियरला रवाना झाली. मध्यप्रदेश आणि जम्मू व काश्मिर आणि इतर राज्यांनी राज्य सरकारशी संपर्क साधून प्रवाशांना त्यांच्या संबंधित राज्यात पाठविण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केल्याची माहिती उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर मेनका आयएएस यांनी दिली. राज्य सरकारच्या यंत्रणेच्या मदतीने तशी व्यवस्था करण्यात आली.
सर्व प्रवाशांना खास कदंब बसने त्यांच्या घराच्या स्थानावरून ते पेडे क्रिडा प्रकल्प आणि मडगांव नेहरू स्टेडियमवरून आणण्यात आले. प्रवाशांची आवश्यक नोंदणी करून वैध्यकिय कर्मचा-यांनी कोविड-१९ च्या लक्षणांची चांचणी केली.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्री अजित रॉय आयएएस, अतिरिक्त जिल्हाधिकारी (दक्षिण) श्री अरविंद कुट्टीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ (उत्तर) श्री गोपाळ पार्सेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ श्री दशरथ रेडकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी (उत्तर) श्री शशांक त्रिपाठी आयएएस, डीआयजी गोवा श्री परमदित्य आयपीएस, एसपी (उत्तर) श्री उत्कर्ष प्रसन्न आयपीएस, डीवायएसपी रेल्वे सरंक्षण दलाचे श्री साथीसन व्ही. व्ही, कोंकण रेल्वेचे सरव्यवस्थापक श्री जोझफ जॉर्ज, उपमुख्य व्यवस्थापक के. आर श्री बाबन घाटगे, वरिष्ठ कमर्शियल इन्स्पेक्टर श्री अनुप पेडणेकर व इतरांनी संपूर्ण कार्याची देखरेख केली.
लॉकडाऊन काळात कार्यकारी जिल्हाधिका-यांमार्फत जिल्हाधिका-यांनी राज्याच्या सीमेवर व तपासणी नाक्यांवर कठोर दक्षता राखण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलीस अधिका-यांसोबत गोवा सुरक्षित राहण्यासाठी चोख कामगिरी बजाविली.
श्री. शांतो जी. नाईक