कोविड संकटात उद्भवलेल्या परिस्थीती पेक्षा इतर विषय महत्वाचे का हे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करावे : दिगंबर कामत

0
413
गोवा खबर :गोव्यातील प्रत्येक नागरीक हा आपलाच नातलग आहे. कोविडचा प्रत्येक रुग्ण हे आपलेच आई-वडील आहेत, संसर्ग झालेले प्रत्येक मुल हे आपलेच आहे ही भावना ठेऊन सोमवारच्या  एक दिवसीय अधिवेशनात सर्व कामकाज बाजुला सारुन, केवळ कोविड संकटावर व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीवर चर्चा करणे सर्व लोकप्रतिनीधींचे कर्तव्य आहे . मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी कोविडपेक्षा इतर विषय व कामकाज महत्वाचे आहे का हे स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
कोविड हाताळणीत गोव्यातील भाजप सरकार पुर्णपणे अपयशी ठरले असुन, लोकाना घाबरू नका असा सल्ला देणारे सरकारच आज कोविड संकटावर  विधानसभेत चर्चा करण्यास घाबरत आहे असा दावा  कामत यांनी केला. कोविड मृत्युंची संख्या वाढत आहे. १४ वर्षाच्या मुलीच्या झालेल्या दुर्देवी मृत्युने आपल्याला धक्काच बसला आहे. सरकारने ताबडतोब कोविड हाताळणीत संवेदनशीलता न दाखवल्यास, गोमंतकीयांना गंभीर संकटात भाजप सरकार ढकलणार आहे हे सरकारने ध्यानात ठेवावे,असा इशारा कामत यांनी दिला आहे.
आज कोविड इस्पितळात केवळ ५० टक्के खाटा भरलेल्या असल्याचा दावा करुन, उत्तर गोव्यात कोविड इस्पितळाची गरज नाही असे आरोग्य सचिवानी म्हटले आहे. तसे असल्यास गोवा सरकार खासगी इस्पितळातील अतीदक्षता विभागात २० टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित करुन ठेवण्याचा आदेश  का रद्द करीत नाही असा प्रश्न करुन, कामत यानी सदर आदेश त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.
कोविड चाचणीच्या प्रतिक्षेत असलेल्या अहवालांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता सुमारे सात हजार चाचणी अहवाल प्रलंबित आहेत ही सरकारची अधिकृत आकडेवारीच सांगते. एकंदर परिस्थीति चिंताजनक आहे,असे कामत म्हणाले.
गोवा विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात सरकारने कोविड संकटाचा विषय चर्चेला घ्यावा ही तमाम गोमंतकीयांची मागणी आहे. सरकार लोकभावनांचा आदर करणार नसेल तर विरोधी आमदाराना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा  कामत यानी दिला आह