कोविडमुळे मृत्यू झालेल्या संख्येवर साशंकता असल्यामुळे रुग्णालयांना दोष देणे पुरेसे नाही, सरकारने याच्या उत्तरदायित्वासाठी मृत्यूचा अधिकृत अहवाल जाहीर करावा : अ‍ॅड. सुरेल तिळवे

0
81
गोवा खबर : आम आदमी पक्षाने आज राज्य सरकरकडे कोविडमुळे झालेल्या ७४ मृत्यूचा अधिकृत अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी खासगी रुग्णालयांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूचा यापूर्वीचा अहवाल मिळालेला नाही. आपचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी सांगितले की, सरकारच्या आकडेवारीनुसार एकूण 74  मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाहीये.
सोबत त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, सुरुवातीला असे म्हटले जात होते की, मृत्यूंची नोंद झालेली नाही, मग त्यांनी आणखी पाच जण आहेत असे म्हणत त्यात समाविष्ट केले आणि आता आणखी दोन मृत्यू घोषित करण्यात आलेले आहेत म्हणूम हे एकूणच हे प्रमाण आता 74 वर पोहोचले आहे.
अ‍ॅड सुरेळ यांनी असे निदर्शनास आणून दिले की सरकारने जाहीर केलेल्या मीडियाच्या अधिकृत अहवालामध्ये या मृत्यूंचा उल्लेख केलेला आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचा सरकारी अधिकृत अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. कारण या मृत्यूच्या अहवालामध्ये मृताचे नाव, मृताच्या भरती होण्याची तारीख, रुग्णाला आधी कोणता आजार होता का?, मृत्यूचे कारण काय?, रुग्णांचा 24 तासाच्या आत मृत्यू झाला किवां नाही? आणि रुग्णाने आधी कोरोनाची लस घेतली होती की नाही? याची सविस्तर माहिती यात दिली जाते.
अ‍ॅड सुरेळ पुढे म्हणाले की, “ही सर्व माहिती अत्यंत महत्वाची आहे आणि या 74 रुग्णांच्या बाबतीत ती पुरविली गेली की नाही? याबद्दल साशंकता आहे आणि म्हणूनच सरकारने त्वरित या रूग्णांच्या “मृत्यूचा अधिकृत अहवाल “प्रसिद्ध करावा, अशी आमची मागणी आहे.
शासनाने नियुक्त केलेले या नोडल अधिकाऱ्यांना या गळतीच्या माहितीबद्दल माहिती नव्हती का? जर नसेल तर ती का नव्हती? हे सर्व प्रश्न सर्वांसाठी चिंतेची बाब आहेत आणि म्हणूनच आम्ही न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत एक नैतिक जबाबदारी म्हणून आरोग्यमंत्री राणे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहेत.
सरकारने जर मृत्यूचा अधिकृत अहवाल दिला तर लसीकरणाचा दर्जा बरोबरच प्रशासनाकडून होणारी गंभीर उणीव नेमकी काय आहे? हे निश्चित करण्यात मदत होईल, आरोग्यमंत्री व्ही. एस. राणे आणि सीएम सावंत यांनी गोव्याच्या  फायद्यासाठी यावर कार्य करण्याची निश्चितच गरज आहे.