कोविडमुक्त झाल्यानंतर नवीन जन्म घेऊन सकारात्म बनलो:नाईक

0
462

गोवा खबर:कोविडची लागण झाल्यानंतर उपचारासाठी 14 ऑगस्ट रोजी मणिपाल हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.हॉस्पिटल मधून निघाल्या नंतर साई बाबांचे दर्शन घेऊन नाईक घरी परतले. तेथे त्याचे ओवाळणी करून स्वागत करण्यात आले.

कोविड मधून बरे झाल्या नंतर आपल्या भावना व्यक्त करताना नाईक म्हणाले, आज मी आणखी एक बरा  झालेला रुग्ण आणि कोविड-19 महामारी आजारातून बाहेर पडलेली एक नवीन  जन्म घेतलेली व्यक्ती म्हणून उदयास आलो आहे.आता आपण अतिशय सकारात्मक बदल झालेली व्यक्ती देखील बनलो आहे.
14 ऑगस्ट रोजी मला गोव्यात मणिपाल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आणि तेव्हापासून मी बरेच चढउतार पाहिले,असे सांगून नाईक म्हणाले,
माझ्या आयुष्याच्या या टप्प्यात मी या देशातील वैद्यकीय कर्मचारी कोविडशी लढण्यासाठी केलेल्या अलौकिक प्रयत्नांचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे.  या सर्व कोविड हिरोना माझा सलाम.
नाईक म्हणाले,आपल्या उपकारकर्त्यांची नावे सांगताना नेहमीच काही महत्त्वाची नावे अजाणीवपूर्वक विसरण्याची जोखीम असते पण तरीही काही जणांचे नावं  माझ्या  कृतज्ञतेचे नोंदवहीत  ठेवावे लागते. उपचार करणाऱ्या युनिटचे प्रमुख  मनीष त्रिवेदी यांचे विशेष कौतुक असून  ज्यांनी आवश्यक ते प्रत्येक संसाधन उपलब्ध असल्याचे सुनिश्चित केले.
मणिपाल टीमचे कोविड केअर इंटरनेस्टिस्ट्सचे डॉ.  मिलिंद नाईक, अमोल महालदार (इंटरेसिस्ट्स) डॉ गौरेश पलाव, डॉ मीशा सेठी आणि डॉ  इलेन रॉड्रिग्स आणि माझे पलोमोनोलॉजिस्ट डॉ.प्रसाद  प्रभु  यांचे आभार मानत नाईक म्हणाले,रीवा बार्नेटो, जिनो पाउलोस आणि  नम्रता नाईक यांच्या नेतृत्वाखालील नर्सिंग चमू तसेच इतर परिचारिका, ज्यांनी मला बरे होण्यास मदत केली,त्यांच्या बद्दल नेहमीच कृतज्ञ राहणार आहे.
वेळेवर दान , चाचणी आणि रक्तसंक्रमणांची व्यवस्था करून  कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्माची मला  संजीवनी देण्याची जबाबदारी मुख्यत: डॉ. धवल फडडू यांच्यावर होती,त्यांनी ती योग्य रित्या सांभाळली याची आठवण नाईक यांनी करून दिली.
एम्स नवी दिल्ली येथील तज्ज्ञ डॉ. अनंत मोहन (पल्मोनोलॉजीचे प्रमुख) आणि डॉ. राजेश्वरी (अयनेस्थेसिया आणि ट्रॉमा सेंटर प्रमुख) आणि दोन वेळा गोव्यात आलेले संचालक डॉ. रणदीप गुलेरिया जे सतत मणिपाल रुग्णालयात डॉक्टर्सना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत होते,याची आठवण करून देत नाईक म्हणाले,आर्मी हॉस्पिटल, नवी दिल्ली यांच्याकडून आलेल्या डॉक्टर्सचे देखील आभार मानतो.
नाईक म्हणाले,गोवा मेडिकल कॉलेजचे  डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि रुग्णालयात मला नेहमी भेट देणारे डॉ. उदय काकोडकर आणि डॉ. अनार खांडेपारकर यांचे मनापासून आभार मानतो.
गोमंतकियांना कोविड मध्ये लढा देण्यासाठी सदोदित मदत करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री श्री विश्वजित राणे यांनी केलेल्या सर्व कामांचे मी मनापासून कौतुक करतो,असे सांगून नाईक म्हणाले, त्यांच्या अथक  प्रयत्नांना यश मिळावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. केंद्रीय आरोग्यमंत्री  डॉ. हर्षवर्धन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी माझी प्रकृती जाणून घेण्यासाठी वेळ काढला, त्यांनी दाखवलेल्या  काळजीने मी मनापासून प्रभावित झालो आहे.
डॉ. शेखर साळकर यांचेही  मी खूप उपकारी आहे,असे सांगून नाईक म्हणाले, ज्यांनी मला आज हा दिवस दिसेल याची स्वतः खात्री करुन घेतली.
नाईक म्हणाले, पत्नी  विजया हिने  गेले चार आठवडे माझ्यासोबत  रुग्णालयात घालवले. माझे सर्व कुटुंब आणि माझ्या लाखो अनुयायांचे विस्तारित कुटुंब ज्यांनी मला त्यांच्या प्रार्थनांमध्ये समावेश केला .माझे कार्यकर्ते आणि कर्मचारी तसेच प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आलेल्या देणगीदार या सगळ्यांचे आभार .
 नाईक म्हणाले,मी काही दिवस विश्रांती आणि सावधगिरी  घेत आहे. आपल्या सर्वांचे  सहकार्याची विनंती करून तुम्हाला खात्री देतो की मी लवकरच सार्वजनिक सेवेत सामील होणार आहे, आणि विशेषतः कोविडविरूद्ध लढा करण्यात तुमच्या बरोबरी राहणार आहे .