कोलवा पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईतील 2 युवतींची सुटका

0
1183
गोवा खबर:  पर्यटन हंगामाला सुरुवात होताच किनारी भागात वेश्यव्यवसायानेही आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबईहून युवती आणून त्यांना गोव्यात वेश्याव्यवसायाला जुंपणाऱ्या  अनिता रामदास भिसे (वय 45) या महिलेसह पोलिसांनी आझाद हुसेन खान (वय 45) या दलालांच्या मुसक्या काल आवळल्या. आज या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.कोलवा पोलिसांनी मुंबई मधील 2 युवतींची सुटका करण्यात यश मिळवले आहे.
 अनिता ही मूळ महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील आहे. सध्या तिचे वास्तव मुबंईतल्या विरार येथील पालघर भागात होते असे तपासात आढळून आले आहे. आझाद हा मडगाव शहरातील मालभाट भागातील रहिवाशी आहे.
मंगळवारी सांयकाळी उशिरा कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उपनिरीक्षक शिवराम गावकर, महिला हवालदार एलिझा फर्नाडीस, पोलीस शिपाई अजय नाईक व विकास कौशिक यांनी ही कारवाई केली.
कोलवा किनाऱ्यावरील पार्किंगच्या जागेत पोलिसांनी ही कारवाई करुन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मोबाईलच्या माध्यमातून संशयित गिऱ्हाईकांशी संपर्क साधत होते. नंतर सौदा पक्का झाल्यानंतर  गिऱ्हाईकांना युवती पुरवण्यात येत होती. कोलवा पोलिसांना ही माहिती मिळाताच त्यांनी सापळा रचून या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.
Attachments area