कोरोना पासून असुरक्षित लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी अनिल अग्रवाल यांनी उभारला १०० कोटींचा निधी

0
930

गोवा खबर: वेदांता लिमिटेड, धातू आणि खाणकाम या जागतिक संघटनेने
आज प्राणघातक कोरोनाच्या व्यापक उद्रेकाचा सामना करण्यासाठी भारत
सरकारबरोबर १०० कोटींचा निधी उभारण्याची घोषणा केली. हा निधी तीन विशिष्ट
क्षेत्रांतील लोकांना मदत करेल. त्यात दैनंदिन वेतन घेणारे कामगार,
कर्मचारी व कंत्राटी कामगार, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.
परिसरातील समुदायांना वेळेवर मदत पुरवण्याचा निर्धारही समूहाने केलेला आहे.

“जग सध्या कोरोना च्या विरोधात लढाई लढत आहे. भारत सरकारने राज्य सरकारांसह
व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आतापर्यंत उत्तम काम केले आहे. कॉर्पोरेट
संस्थांनी या प्राणघातक विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी सरकारला हातभार
लावायला मदत केली पाहिजे जेणेकरून देशातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी आणि
वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध राहतील.
हा निधी वेदांताच्या वतीने पहिले पाऊल आहे आणि गरज भासल्यास आम्ही निश्चितच
अधिक सहाय्य करू. याव्यतिरिक्त, आम्ही उदरनिर्वाह गमावलेल्या विविध
समुदायांना मदत करू. देशातील प्रत्येक नागरिकाने सुरक्षित राहून जबाबदारीने
वागावे अशी मी विनंती करतो.  मला आपल्या लोकांची मनापासून चिंता आहे पण जर
आपण सकारात्मक राहिलो आणि पुरेशी खबरदारी घेतली तर आपण अधिक मजबूत होऊ,”
वेदांता रिसोर्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री अनिल अग्रवाल म्हणाले.

इतर उपाययोजनांचा एक भाग म्हणून वेदांता समूह या संकट काळात तात्पुरत्या
कामगारांची वेतन कपात करणार नाही किंवा कर्मचार्यांना काढून टाकणार नाही.
तसेच वेदांताच्या कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोविड – १९
च्या विरुध्द संरक्षण देण्यासाठी खास, एक वेळचा विमा देण्याचा निर्णय घेतला
आहे. सर्व मोबाईल हेल्थ व्हॅन दुर्गम भागात आरोग्यसेवेस मदत करतील आणि
प्रत्येक व्यावसायिकांना जसे चहा विक्रेते आणि भाजी विक्रेत्यासारख्या
आपल्या रोजंदारीवर काम करणार्यांच्या विकासाठी हातभार लावेल.

एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून वेदांता आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या या मोफत
आरोग्य तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची
सुविधा उपलब्ध करून देणे, वंचितांना शिष्यवृत्ती देणे, महिलांना मदत करणे
यासह अनेक विकासात्मक गोष्टींवर त्यांच्या ठिकाणी असलेल्या समुदायांबरोबर
जवळून कार्य करत आहेत. युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण शिबिर आणि त्याच्या
आसपासच्या ठिकाणी सार्वजनिक पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी सुद्धा
वेदांता समूह अग्रेसर आहे.