कोरोनाविरोधात लढ्यात आणखी काळजी घेणे गरजेचे:  श्रीपाद नाईक

0
757
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या आक्रमणाविरूद्ध भारताने चांगला लढा दिला आहे. त्याला जनतेनेही  चांगली साथ दिली असल्याने भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य देशापेक्षा कमी प्रमाणात आहे. गेल्या तीन महिन्यात जगात कोरोनामुळे सर्वात कमी लोक मृत्यू झाले आहेत. गोव्यातही कोरोनाचे रुग्ण संख्या शुन्यावर पोचली होती. तसेच कोरोनाचे अधिकाधीक रुग्ण बरे होत असल्याने गोव्याला ‘ग्रीन झोन’मध्ये सामील करण्यात आले होते. वास्कोत आता नव्याने उद्रेक झाला आहे. यामुळे, आणखी थोडे दिवस आम्हाला काळजी घ्यावी लागणार असून सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे लागणार आहे.राज्यात पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक टॅक्सी, रिक्शा, पायलट आदी लोक अडचणीत आले आहेत. या लोकांना काही प्रमाणात मदत करण्यासाठी आम्ही वावरत असून मास्क, औषधे, सेनिटायजर्स आदींचे वाटप केले जात असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार)श्रीपाद नाईक यांनी सांगितले. 
 म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमात म्हापशा शहरातील टॅक्सी, रिक्शा आणि पायलटांना कोरोनाच्याविरोधात प्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी  औषधे आणि सेनिटायजर्स आदींचे  मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी म्हापसाचे आमदार जोशआ डिसोझा  म्हणाले, की कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वांना त्रास झाला असून 30 जूनपर्यंत बंदी वाढवण्यात आली आहे. दैनदिन उपजिवीकेवर जगणारे टॅक्सी, रिक्शा आणि पायलटांना अतोनात कष्ट पडत आहे. या  लोकांना केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या मदतीचे आपण आभार मानत आहे.
थिवीचे आमदार ग्लेन टिकलो म्हणाले, की म्हापशा शहरातील आज 350 टॅक्सी, रिक्शा आणि पायलटांना कोरोनाविरोधात लढ्यासाठी  औषधे आणि सेनिटायजर्स  वाटप केले आहे. गोव्यातही कोरोनाच्या विरोधात लढा चांगला दिला असून रुग्णांची संख्या नियंत्रणाखाली आणण्यात आली होती. मात्र, आता वास्कोत नव्याने कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे आढळून आले असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
उत्तर गोवा भाजप मंडळाचे अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी आभार व्यक्त करताना सांगितले, की बोडगेश्वरच्या पवित्र ठिकाणी औषधे वाटप करण्याचे काम होत आहे. मंदिरांच्या सर्व सदस्यांनी या कार्यात चांगले योगदान लाभले आहे. औषधाचे नियमीतपणे सेवन केल्यास कोरोनाच्याविरोधात माणसाची प्रतिकारशक्तीत वाढ होणार आहे.
यावेळी माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, भाजपाचे उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो, म्हापासा पालिकेचे नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.