कोरोनापासुन मुक्ती मिळालेली नाही हे ध्यानात ठेवुन जास्त खबरदारी घेणे गरजेचे : कामत

0
797
गोवा खबर: कोविडची लागण झालेला सातवा रुग्ण बरा झाल्याने एकही कोरोनाग्रस्त आता गोव्यात राहिलेला नाही व गोवा सुरक्षित जरी असला तरी आपणाला कोरोनापासुन मुक्ती मिळालेली नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. सामाजीक चाचणी सुरू केल्यानंतरच आपण सुरक्षित विभागातून कोरोनामुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने पात्र ठरणार आहोत हे सरकारने ध्यानात ठेवावे,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.

कोविड संकटाचा सामना करणारे वैद्यकिय पथक, फ्रंटलाईन स्वयंसेवक यांच्या अथक परिश्रमाला माझा सलाम. आपला जीव धोक्यात घालुन इतरांना सुरक्षा देणाऱ्या या सर्व देवदूतांचे संपुर्ण गोमंतकीय कायम ऋणी राहतील,असे कामत म्हणाले.
कामत म्हणाले,गोमंतकीयांनी लाॅकडाऊन काळात दाखवलेला संयम व शिस्तबद्द वागणुक यासाठी ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. यापुढे त्यानी असेच सहकार्य देणे अपेक्षित आहे.
सरकारने आता स्क्रिनींग व टेस्टिंगचा वेग वाढवणे गरजेचे आहे,असे सांगून कामत म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उपाय योजना आखण्यासाठी योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे.