कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा भारताचा आलेख चढता, 47.5 लाखाहून अधिक कोरानामुक्त

0
485बरे झालेल्यांपैकी 73 टक्के नागरिक 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले

 

गोवा खबर:भारताने एका दिवसात सुमारे 15 लाख कोरोना चाचण्या करत एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करत असतानाच कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा देशाचा आलेखही चढता ठेवला आहे. 

आतापर्यंत 47.5 लाखाहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झालेअसून गेल्या 24 तासात 81,177 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा (9,70,116)  बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 38 लाखांनी (37,86,048) जास्त आहे.   

इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने रुग्ण बरे होण्याच्या  राष्ट्रीय दरातही सातत्याने वाढ होत आहे. आज हा दर 81.74% आहे. 

बरे झालेल्यांपैकी 73% महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत. 

रुग्ण बरे होण्याची संख्या महाराष्ट्रात आजही सर्वाधिक राहिली, महाराष्ट्रात 17,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले तर आंध्रप्रदेशातही एका दिवसात 8,000  पेक्षा जास्त रुग्ण  बरे झाले. 

WhatsApp Image 2020-09-25 at 11.09.24 AM.jpeg

गेल्या 24 तासात देशात 86,052 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी 75% रुग्ण 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्रात 19,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात मिळून  7,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले. 

WhatsApp Image 2020-09-25 at 11.06.35 AM.jpeg

गेल्या 24 तासात 1,141  मृत्यूंची नोंद झाली, त्यापैकी 83 % मृत्यू  10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात झाले आहेत.

काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 40 % मृत्यू महाराष्ट्रात झाले असून इथे 459 मृत्यूंची नोंद झाली, पंजाब मध्ये 76 आणि उत्तर प्रदेशात 67 मृत्यूंची नोंद झाली आहे. 

WhatsApp Image 2020-09-25 at 11.06.35 AM (1).jpeg