कोरोनाची लागण झालेले तब्बल 125 रुग्ण आज बरे

0
445
गोवा खबर:कोरोनाची लागण झालेले तब्बल 125 रुग्ण आज बरे होऊन घरी गेले.नव्याने 52 रुग्ण सापडले असून मृतांची संख्या 7 आहे.
गोव्यात आतापर्यंत 1 हजार 813 रुग्ण सापडले असून त्यातील 745 सक्रिय असून 1 हजार 61 जण बरे झाले आहे.सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे अजुन देखील परिस्थिती गंभीरच आहे.
वास्को मधील मांगोर हिल मधील रुग्ण कमी होऊ लागले आहेत.आज मांगोर हिल मध्ये 99 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत रुग्णाची संख्या काही कमी झालेली नाही.मांगोर हिलशी निगडीत रुग्णांची संख्या 238 आहे.
मडगाव मध्ये 22,इंदिरानगर-चिंबल मध्ये 28,मुख्यमंत्र्यांच्या साखळीत 43 रुग्ण आहेत.
याशिवाय मोठ्या प्रमाणात रुग्ण असलेल्या ठीकाणांमध्येसडा(70),बायणा(72),कुडतरी
(31),न्यूवाडे(60),चिंबल(52),झुवारीनगर(98),मोर्ले(22),खेरवाडा(31) आणि बाळळी (23) यांचा समावेश आहे.