गोवा खबर:बेतोडा -निरंकाल येथील कोडार कसमशेळ प्रभागातुन  भाजपा उमेदवार  सुभाष शिरोडकर यांना मताधिक्क्य मिळवुन देणार असे प्रतिपादन कोडार प्रभागाचे भाजपा बुथ अध्यक्ष परेश नाईक यांनी कोडार येथील घर चलो अभियाना अंतर्गत केले.
 भाजपा उमेदवार शिरोडकर यांच्या प्रचार फेरीत सहभागी झाल्यानंतर  पत्रकारांशी बोलताना बोलताना नाईक  यांनी शिरोडकर विजयी होतील,असा दावा केला.
यावेळी त्यांच्या सोबत जि.पं.सदस्य दिपक नाईक बोरकर,भाजपा मंडळ अध्यक्ष सुरज नाईक,बेला शिरोडकर,माजी पंच प्रसाद प्रभुगावकर,पंच गुरु सालेलकर,माजी सरपंच अशोक नाईक,विशांत गावकर, व उमेदवार सुभाष शिरोडकर उपस्थित होते
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिरोडकर म्हणाले, गेल्या ३५ वर्षात बेतोडा निरंकाल कोडार येथील मुलभुत सेवा देण्याचा प्रयत्न करण्यास यशस्वी ठरलो आहे. पुर्वी पायवाटा होत्या त्याचे रस्त्यामध्ये रुपांतर झाले आहे. पाण्याची व्यवस्था व विजेची सोय प्रत्येकाच्या घरात पोचवली आहे.त्याच बरोबर इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळीभाजपा मंडळ अध्यक्ष सुरजनाईक,जि.पं.सदस्य.दिपक नाईक बोरकर,पंच गुरु सालेलकर माजी सरपंच अशोक नाईक परेश नाईक विशांत गावकर आणि कार्यकर्ते प्रचारफेरीत सहभागी झाले होते.