कोटपा कायद्याखाली तालुका अंमलबजावणी पथकाची पुर्नस्थापना

0
302

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने धारबांदोडा, मुरगांव, सांगे, केपे, काणकोण, फोंडा आणि सासष्टी तालुका गटपातळीवरील अंमलबजावणी पथकाची सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३ (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य उत्पादन नियमन पुरवठा  आणि वितरण)  च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुर्नस्थापना करण्यात आल्याची माहिती दिली.

या अंमलबजावणी पथकात मामलेदार, संयुक्त मामलेदार, संबंधित तालुक्यातील कार्यकारी दंडाधिकारी, पीएसआय, संबंधित भागातील पोलीस अधिकारी, संबंधित आरोग्य केंद्रातील सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि गोवा कॅन सदस्याचा समावेश आहे.