कोंकणी प्रेमींसाठी जागतिक कोंकणी संगीत पुरस्कार सोहळा

0
916

 

 

गोवा खबर:बहुचर्चित अशा कोंकणी संगीत पुरस्कार सोहळ्याचे व्यासपीठ आता सज्ज झाले आहे, शिवाय विजेत्यांची निवड करण्यात आली असून या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. 7 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी बरोबर 7.30 वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा सोहळा सुरू होणार आहे. या सोहळ्यासाठी बरोबर 6.30 वाजता संगीत प्रेमींसाठी त्यांचे आवडते संगीत क्षेत्राशी निगडित लोक रेड कार्पेटवर पहायला मिळणार आहेत.

 

निवड प्रक्रियेस जगभरातून 150 प्रवेशिकांसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अमेरिका, लंडन, दुबई, कुवैत, मंगलोर आणि गोवा येथून या प्रवेशिका आल्या होत्या. परीक्षकांमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय गायिका हेमा सरदेसाई, निर्मिका सिंग, अतुल चूरमणी यांच्यासाठी विजेते ठरवणे अत्यंत आव्हानात्मक होते. त्यांनी आपले निर्णय घेतले आहेत आणि 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पुरस्कारांच्या सादरीकरणात या विजेत्यांची घोषणा केली जाईल.

 

संध्याकाळी कोकणीतील संगीतातील प्रमुख कलाकार रीता रोजसारखे कोंकणीप्रेमी येणार असून त्या कोंकणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल पती दिवंगत अल्फ्रेड रोज यांच्यावतीने प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारतील. तसेच कोंकणीप्रति दिलेल्या योगदानाबद्दल ख्रिस पेरी आणि एरिक ओझारियो यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

 

गोव्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडमधील नामांकित गायक बाबा सहगल, गोव्यातील प्रसिद्ध तारका लोर्नाही उपस्थित असतील आणि  लोर्ना या रात्री त्यांची गाणी सादर करणार आहेत.

 

कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉल्फी मास्कारेन्हस म्हणाले, “या कार्यक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशिकांच्या प्रतिसादामुळे आम्ही अत्यंत खूष आहोत. कोंकणी संगीताच्या निर्मितीमध्ये बरेच छुपे तारे आहेत. डब्ल्यूकेएमए या प्रतिभावान व्यक्तींनी पुढे यावे म्हणून प्रोत्साहन देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.”

 

अॅलन वाझ म्हणाले, ‘कोंकणी संगीतजगतात इतिहास घडवणाऱ्या या संगीत पुरस्कारांची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे. सर्व सहभागींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा’.

 

मंचावर ग्लॅमर आणण्यासाठी होस्ट म्हणून अभिनेता ल्यूक केनी आणि मिस वर्ल्ड ब्युटी क्वीननधील, 2 ऱ्या रनर अपच्य विजेत्या नकिता फर्नांडिसही असतील.

 

डब्ल्यूकेएमए हे 92.7 बिग एफएम, गोवा माईल्स, मॅक हॉटेल्स, बिग 92, फुतार्दोस, मॉल दे गोवा, कंटेंट लाईफ मीडियासोबत पार्टनर आहेत .

 

या कार्यक्रमात अनेक प्रकारची सादरीकरणे आणि भेटीगाठी अनुभवायला मिळतील.

कोंकणीतील मोठा गायन स्पर्धेचा मुकुट कोणाला मिळेल?