कोंकणी चित्रपट ‘7 डेझ-रिबेलियस वि स्टेंड, सुशेगाद वि फॉल’ आज प्रदर्शित

0
1011

 

~हा चित्रपट जॉयविन फर्नांडिसद्वारा लिखित व दिग्दर्शित आणि रॉकी विल्झ निर्मित आहे. सिंगम चित्रपटात काम केलेले अनंत जोग, प्रिंस जेकब, राजदीप नाईक, केविन डिमेलो, सोनम मोरजकर, समिक्षा देसाई व विनोदी कलाकार ऑगस्तिनो असे या चित्रपटाचे स्टार कास्ट आहेत.~

 

गोवाखबर:‘7डेझ-गोव्याचे स्टार अभिनेता प्रिंस जेकबच्या शब्दात म्हणायचे झाले तर प्रत्येक गोवेकरांचे प्रतिध्वनित करू शकतो. 7 डेझ-रिबेलियस वि स्टेंड, सुशेगाद वि फॉल हा चित्रपट उद्या 6 जून 2018 रोजी मडगाव येथील रविंद्र भवनात प्रदर्शित होत आहे. विख्यात मराठी व हिंदी चित्रपटांत काम केलेले व सिंगममध्ये महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनंत जोग, रविंद्र भवनाचे अध्यक्ष प्रशांत नाईक, चित्रपटातील सर्व गोव्याचे स्टार कास्टसहीत कोंकणी चित्रपटांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचं प्रिमियर असणार आहेत.

या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन जॉयविन फर्नांडिस यांनी केले आहे. रॉकी विल्झ स्टुडियो बॅनरअंतर्गत रॉकी विल्झ हे या चित्रपटाचे निर्माते आहे. प्रत्येक गोवेकरांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि अंत:करणाला स्पर्श करणाऱ्या या चित्रपटात सोप्या पण प्रभावी संदेशाने अभिव्यक्त करेल. आपण ज्या परिस्थितीचा सामना करतो त्याची जबाबदारी घेऊन त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

या चित्रपटाला राजस्थान आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये (आरआयएफएफ) स्थानिक चित्रपट विभागात सर्वोत्तम कथेचा पुरस्कार मिळाला आहे. 

या चित्रपटात गोव्याचे सर्वांत आवडते तियात्र कलाकार प्रिंस जेकब व विनोदी कलाकार अगस्तिन्होसारख्या प्रतिष्ठित स्टारकास्टसह हा चित्रपट प्रेक्षक वर्गाला साहसी, नाटकी व रहस्यमयी प्रवासावार घेऊन जाण्याचे वचन देतो. याशिवाय राजदीप नाईक, केविन डिमेलो, सोनम मोरजकर, समिक्षा देसाई व अनंत जोग हे या चित्रपटांचे इतर सहकलाकार आहेत. आमच्या या चित्रपटात केवळ एकच बॉलिवूड अभिनेते आहेत व इतर 49 कलाकार गोव्याचेच आहेत. यातून आम्हाला दिसते कि गोव्याच्या कलाकारांना 7 डेझच्या क्रूने किती महत्व दिले आहे, असे प्रिंस जेकब म्हणातात. याशिवाय ते 7 डेझला मोठ्या स्टार कास्टमुळे शोलेची गोव्यातील आवृत्ती असे वर्णन करतात.

चित्रपट एक साहसी नाटक आहे, ज्यात राजकीय वातावरणासह अपराध आणि भ्रष्टाचार थेट लोकांवर परिणाम करतात. या चित्रपटाचा मुळ फोकस चा गोवेकरांवर आहे जे राजकारण व राजकीय लोकांवर कंटाळून काहीतरी करण्याचा निर्णय घेतात. ते एक समूह तयार करतात व स्वत: कायदा हातात घेतात कारण कायदा अधिकारी त्यांना शिक्षा द्यायला असक्षम आहेत असे त्यांना वाटते.  “दररोज वर्तमानपत्रात वाचायला मिळणाऱ्या समस्यांमधूनच मला अशाप्राकारच्या विषयांवर चित्रपट करून विद्रोहीपणे उभे राहण्याबद्दल गोवेकरांनां संदेश पाठविण्याची संधी मिळाली. हा चित्रपट प्रत्येक गोवेकरांशीशी संबंधित आहे आणि त्यापेक्षा खोल पातळीवर जोडण्यात सक्षम आहे,” असे जॉयविन फर्नांडिस म्हणतात. जॉयविन फर्नांडिस यांचा सर्वात अलीकडील ‘एमएमएस’ हा चित्रपट हिट ठरला होता.

 

जॉयविन म्हणतो, “हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी आम्हाला तीन वर्षे लागली व मी हे निश्चित केले आहे कि हा चित्रपट गोव्यातील प्रेक्षकांना संबधित वाटेल. आम्ही आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना सामविष्ट करून घेण्यासाठी  पटकथेत बदलदेखील केले आहेत. या चित्रपटाचा महत्वाचा भाग म्हणजे या चित्रपटाच्या प्लॉटबरोबरच या चित्रपटाचे कास्ट शिवाय ‘7 डेझ’ चित्रपटात वापरण्यात आलेले विएफएक्स (VFX) हे या चित्रपटाला केवळ पाहण्यासाठी मनोरंजक वाटत नाही तर इतर कोंकणी चित्रपटांपेक्षा वेगळे बनवते.  या चित्रपटाद्वारे प्रत्येक लोकांच्या हृदयाला स्पर्श करून त्यांच्या जिवनात बदल घडवणे हे या चित्रपटाचे मुख्य उद्दीष्ट आहे. यामुळे ते या समाजाला गरज असलेला बदल बनू शकेल.”

 ‘7 डेझ’ हा चित्रपट 6 जून 2018 रोजी मडगाव येथील रविंद्र भवनात सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट यानंतर उत्तर व दक्षिण गोव्यात खालील तारखांना प्रदर्शित होणार आहे:

6 आणि 8 जून 2018- सायंकाळी 7:30 वा.-रविंद्र भवन, मडगाव

16 व 17 जून 2018- दुपारी 3:30 व सायंकाळी 7:30वा.-ऍन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), पणजी

 

        कास्ट आणि क्रू

  • निर्माते : रॉकी विल्झ
  • दिग्दर्शक : जॉयविन फर्नांडिस
  • संगीत दिग्दर्शक : फ्रेझर ऍन्ड्र्यू पाशेको
  • संपादक : आत्माराम सावंत
  • कथा, संवाद व पटकथा : जॉयविन फर्नांडिस
  • गीत : रोझारियो फर्नांडिस
  • कास्ट : प्रिंस जेकब, राजदीप नाईक, केविन डिमेलो, सोनम मोरजकर, समिक्षा देसाई व विनोदी कलाकार अगस्तिन्हो

चित्रपटाचे सारांश:

7 डेझ नाटकीय चित्रपट राजकीय वातावरणात चार गोवेकर या सर्व गोष्टींना कंटाळून शेवटी यावर काहीतरी उपाय काढायचे ठरवतात.  ते एक दक्ष गट बनवतात आणि जे लोक गुन्हा करतात त्यांच्या विरोधात व  एक माणूस जो त्यांना वाटतो कि सर्व गुन्ह्यांचा आणि भ्रष्टाचाराचा मूळ कारण आहे यांच्या विरोधात कट रचतात.

या चित्रपटात सात दिवसांचा कालावधी असतो ज्यामध्ये त्यांना सर्वात मोठे आव्हान गुन्हा करणे नसून त्यांना तो गुन्हा चांगल्यासाठी करण्याचे आव्हान असते. सूड घेण्यासाठी किती दूरपर्यंत जाण्यास तयार आहेत हे त्यांचे सर्वांत मोठे आव्हान आहे.

हा चित्रपट जरी एक गंभीर विचारांना उद्युक्त करणारा असला तरी तो मनोरंजाने भरलेलादेखील आहे.