कॉमेडियन भारती आणि नवरा हर्ष  दिसणार बिग बॉसच्या घरात, पहिली विचित्र जोडी जाहीर

0
1101
बिग बॉस सिझन 12 चे सलमान कडून गोव्यात प्रमोशन
गोवा खबर:विचित्र जोडी अशी संकल्पना घेऊन 16 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या बिग बॉस सिझन 12 ची लॉन्चिंग पत्रकार परिषद घेण्यासाठी सलमानने खास गोव्याची निवड केली होती.आज अगदी अनोख्या ढंगात त्याने सिझन 12 चे लॉन्चिंग केले.यावेळी बिग बॉसच्या घरात 100 दिवस राहणाऱ्या 9 विचित्र जोड्यांपैकी एक जोडी कॉमेडीयन भारती आणि तिचा नवरा हर्ष असणार हे आता स्पष्ट झाले आहे.इतर जोड्या कुणाच्या आहेत याची उत्सुकता मात्र अजुन कायम आहे.
यावेळच्या बिग बॉस सिझनसाठी विचित्र जोडी ही संकल्पना घेऊन जोड्या निवडण्यात आल्या आहेत.यात कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्याना लागून राहिली आहे.
  
सलमानच्या उपस्थितीत आज कॉमेडी क्वीन भारती आणि तिचा नवरा हर्ष या एका जोडीची ओळख पत्रकारांना करून देण्यात आली.भारतीने तिच्या लग्ना नंतरची सगळी जबाबदारी कलर्स वाहिनीने घेतल्या बद्दल सांगून त्यांचे आभार मानले.भारती म्हणाली लग्नानंतर कलर्सने आम्हाला खतरों के खिलाडी मध्ये घेतल.आता बिग बॉसच्या घरात स्थान दिले आहे.
भारतीने 2 मिनीटांच्या एंट्री मध्ये आपले इरादे स्पष्ट केले. लेखकांची मुले सलमान सारखी होतात म्हणून आपण सगळ्याना सोडून एका लेखकाशी लग्न केल्याचे तिने यावेळी गंमतीने सांगितले.भारती आता बारीक झाली आहे या सलमानच्या प्रतिक्रियेवर भारतीने आनंद व्यक्त केला. आता माझा विश्वास बसला अस भारती त्यावर म्हणाली.
वीकेंड का वार मध्ये सलमान खान जो क्लास घेतात त्याची भीती वाटते असे भारतीचा नवरा हर्ष याने सांगितले. त्यावर भारती म्हणाली,पूर्वी सलमानने शर्ट काढले की लोग बघत रहायचे. बिग बॉस मध्ये वीकेंड का वार मध्ये सलमान कोट काढून हाताच्या बाह्या वरती करू लागले की अनेकांना घाम फुटतो.यावेळी मी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याने सलमानने मला कधी फैलावर घेतले नाही तर किती बर वाटेल.
सलमानला कलर्स वाहिनीने आपला ब्रैंड अॅम्बेसीडर नेमला आहे.सलमान म्हणाला आता पर्यंतच्या रिलेशन मध्ये माझी सगळ्यात जास्त चाललेली रिलेशन कलर्स सोबतची असून आता पर्यंत 9 वर्षे सुरु असलेले रिलेशन या पुढे सुद्धा चालत राहिल असा विश्वास सलमानने व्यक्त केला.
बिग बॉसचे होस्टिंग करताना मी फक्त मला जेवढ ब्रीफिंग होत तेवढयावर मी थांबत नाही.मी प्रत्येक एपिसोड 2 वेळा बघतो,अस सलमान म्हणाला.
बिग बॉसच्या लॉन्चिंग साठी सलमान 2 दिवसां पूर्वीच गोव्यात दाखल झाला आहे.आल्या आल्या त्याने कृषी मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली होती.सरदेसाई यांनी सलमान सोबत काढलेली सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल केली होती.त्यानंतर दोघे सायकल चालवत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर फिरत आहे.सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी गोव्यात शेतीला ग्लॅमर प्राप्त करून देण्यासाठी प्रसंगी सलमान खानला सुद्धा शेतात उतरवून तरुणांना शेतीकडे आकर्षित करेन असे वक्तव्य केले होते.त्यामुळे सलमान आणि सरदेसाई यांची भेट चर्चेत आहे.