कॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा

0
167
गोवा खबर : आगामी विधानसभा निवडणूकांच्या तयारीचा भाग म्हणुन अमरनाथ पणजीकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या माध्यम विभागाची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे माध्यम पॅनलिस्ट म्हणुन ट्राजन डिमेलो यांना नेमण्यात आले आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने या विभागाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
आज जाहिर करण्यात आलेल्या माध्यम विभागात आर्किटेक्ट, पत्रकार, शिक्षक, डॉक्टर, वकील व इतरांचा समावेश आहे. नवनियूक्त सदस्य भाजपला शिंगावर घेवून सरकारचा गैरकारभार उघड करणार आहेत. आगामी निवडणूकांसाठी कॉंग्रेस पक्ष आक्रमक माध्यम रणनिती आखत असुन, त्या दृष्टिने विचारविनीमय चालू झाल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाच्या “एक व्यक्ति एक पद” तत्वानुसार माध्यम विभागाचे नवनियूक्त अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्याकडे आता सरचिटणीस पद राहणार नाही. नव्यानेच निर्माण केलेले मिडीया पॅनलिस्ट हे पद मिळवीण्याचा पहिला मान ट्राजन डिमेलो यांना मिळाला आहे. आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा हे कॉंग्रेसचे प्रवक्ते होते. नव्याने नेमणूक करण्यात आलेल्यांत ज्येष्ठ पत्रकार महादेव खांडेकर, ॲडं श्रीनिवास खलप, डॉ. आशिश कामत, ॲल्टन डिकॉस्ता व शिक्षीका पल्लवी भगत यांचा समावेश आहे.
कॉंग्रेस पक्षाने मागील आठवड्यात समाज माध्यम प्रमुखपदी हिमांशू तिवरेकर यांची नियूक्ती केली होती. त्यानंतर इंधन दरवाढी विरूद्ध कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात कॉंग्रेस पक्षाला समाज माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद मिळाला अशी माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली.
आज नव्याने नियूक्त झालेले सर्व प्रवक्ते कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे पूढे नेत असतानाच, भाजप सरकारचा गैरकारभार उघड करणार असल्याचा विश्वास गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला.
राजकीय पक्षाचा माध्यम विभाग हा महत्वाची भूमीका बजावतो. माध्यम विभागाच्या कामगिरीवरुनच पक्षाचा प्रभाव वाढतो. नवीन माध्यम विभागाला माझ्या कडुन संपुर्ण सहकार्य मिळेल असे कॉंग्रेस विधिमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.