कॉंग्रेस पक्षाचे इंधन दरवाढी विरोधात धरणे आंदोलन

0
158
गोवा खबर : देशातील वाढत्या इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेस पक्षाने ११ जून रोजी देश पातळीवर धरणे आंदोलन आयोजित केले असुन, याचाच भाग म्हणुन गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती तर्फे राज्यातील चाळीसही मतदारसंघातील विवीध पॅट्रोल पंपांवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कॉंग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी दिली.
गोव्यातील चाळीस ही मतदारसंघातील गट समिती, दोन्ही जिल्हा कॉंग्रेस समिती, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, सेवा दल व एनएसयुआय या इंधन दरवाढ विरोधी धरणे आंदोलनात सहभागी होणार असुन, प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी, आमदार, खासदार या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत असे दिगंबर कामत यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर अगदी खाली आलेले असताना, केंद्रीतील मोदी सरकारने देशातील पॅट्रोल व डिजेलचे दर शंभरीकडे नेले आहेत. गोव्यातही लवकरच इंधनाचे दर शंभर रुपये प्रती लिटर होणार आहेत. कोविड संकटात भाजप सरकार लोकांना सहाय्य करण्याचे सोडुन त्यांना आर्थिक बोजाखाली ढकलत आहे अशी टीका दिगंबर कामत यांनी केली.
मडगाव गट कॉंग्रेस समितीतर्फे नगरपालीका उद्यानाकडील पॅट्रोल पंपावर उद्या ११ जून २०२१ गरोजी सकाळी ११ वाजता धरणे कार्यक्रम होणार आहे अशी माहिती गट अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी दिली.
कॉंग्रेस पक्षाने जनतेचा आवाज बनुन इंधन दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन देश पातळीवर आयोजित केले असुन, लोकांनीही या आंदोलनात सहभागी होवुन आपला निषेध नोंदवावा अशी विनंती दिगंबर कामत यांनी केली आहे.
दिगंबर कामत
विरोधी पक्ष नेते